शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कालव्याचे पाणी सोडले शेतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 21:57 IST

शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा मिळावी म्हणून निर्माण केलेला निम्न वर्धा प्रकल्प सध्या डोकेदुखी ठरू लागला आहे. कालव्याच्या सदोष कामांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याने असंतोष पसरला आहे.

ठळक मुद्देपाटबंधारे विभागाचा प्रताप : पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा मिळावी म्हणून निर्माण केलेला निम्न वर्धा प्रकल्प सध्या डोकेदुखी ठरू लागला आहे. कालव्याच्या सदोष कामांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याने असंतोष पसरला आहे. देवळी तालुक्यातील मौजा रायपूर येथे असाच प्रकार झाल्याने शेतातील पिकांना धोका निर्माण झाला आहे. वरिष्ठांनी याकडे लक्ष देत कार्यवाही करणे अगत्याचे झाले आहे.निम्न वर्धा प्रकल्पाचा डावा कालवा देवळी तालुक्यातून गेला आहे. सदर कालवा मौजा रायपूर येथील सर्व्हे क्र. ९९.१०० या शेताजवळ बंद करण्यात आला आहे. कालव्याचे अतिरिक्त पाणी सोडण्यासाठी शेताच्या जवळ नाली करण्यात आली आहे. भविष्यात या कालव्याला पाणी सोडल्यानंतर अतिरिक्त पाणी सदर नालीतून वाहून जाताना शेतात शिरण्याचा धोका आहे. यामुळे शेतकऱ्याला मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागणार आहे. रायपूर येथील दत्तात्रय मसणे यांच्या शेताच्या धुऱ्यावरच कालव्याचे पाणी वाहून जाण्याकरिता नाली करण्यात आली आहे. नालीलगत रस्त्याची निर्मिती करण्यात आलेली आहे. सदर कालवा शेताजवळ बंद झालेला आहे. यामुळे कालव्यातील अतिरिक्त पाणी शेताच्या बाजूने नालीद्वारे वाहून जाणार आहे. परिणामी, मसणे यांच्या शेतातील पिकांनाच धोका निर्माण झाला आहे. सर्व्हे क्र. ९८ हे बाबाराव मसणे यांचे शेत असून या पाण्यामुळे त्यांच्यासह अन्य शेतकऱ्यांच्या शेतातील पिकेही धोक्यात आली आहेत.कालव्याची कामे करताना शेतकऱ्यांशी चर्चा केली जात नाही. त्यांची कुठलीही परवानगी घेतली जात नाही वा त्यांना सूचनाही दिली जात नाही. परिणामी, सिंचनाची सुविधा मिळावी म्हणून केलेली कामे शेतकऱ्यांना नुकसानदायक ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. निम्न वर्धा प्रकल्पाच्या कालवे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे. तत्पूर्वी शेतकरी मसणे यांनी अनेकदा तक्रारी केल्या. त्यावर तलाठ्याकडून अहवालही मागविण्यात आला; पण अद्याप कुठल्याही उपाययोजना केल्या गेल्या नाहीत. यामुळे कालव्याला पाणी सोडल्यानंतर तथा पावसाळ्यात मसणे यांना शेती करणेच जिकरीचे ठरणार आहे. यामुळे वरिष्ठांनी लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे झाले आहे.अनेक ठिकाणी कामे अपूर्णचगत कित्येक वर्षांपासून निम्न वर्धा प्रकल्पाच्या कालव्याचे काम सुरू आहे; पण अद्यापही डावा कालवा पूर्णत्वास गेलेला नाही. पुलगाव शहरात अद्याप खोदकामही पूर्ण करण्यात आलेले नाही. असे असले तरी कालव्याला पाणी सोडले जाते. परिणामी, शहरात तथा परिसरातील गावांत अनेक घटना घडल्या आहेत. देवळी तालुक्यात बहुतांश ठिकाणी कालव्याचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे; पण पुलगाव शहरातील कालव्याचे काम पूर्णत्वास गेलेले नाही. शिवाय पाटचऱ्यांची कामे अद्याप सुरूही करण्यात आलेली नाहीत. यामुळे बहुतांश शेतांपर्यंत अद्यापही पाणी पोहोचलेले नाही. पाणी उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांची अद्याप सिंचनाची सुविधा झालेली नाही. निम्न वर्धा प्रकल्प कालवे विभागाने याकडेही लक्ष देत कालवा तथा पाटचऱ्या पूर्ण करणे गरजेचे आहे.मसणे यांच्या तक्रारीवरून वरिष्ठांनी मोका पाहणी केली. सदर शेताजवळ कालवा बंद केला आहे. शेताच्या शेजारून काढलेली नाली बुजवून पाटचरी तयार करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यामुळे शेतकऱ्याचा प्रश्न निकाली निघणार आहे.- आर.आर. बोडेकर, उपअभियंता, निम्न वर्धा प्रकल्प, कालवे विभाग, देवळी.