शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

कालव्याचे पाणी शेतात शिरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 00:28 IST

बोरखेडी तलावाच्या नादूरूस्त पाटचºया व पाणी वापर संस्थेच्या लहरीपणाचा फटका परिसरातील शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. नादूरूस्त पाटचºयांमुळे सिंचनासाठी सोडलेले पाणी थेट मदना येथील एका शेतकऱ्याच्या शेतात शिरल्याने त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

ठळक मुद्दे उभ्या पिकाचे नुकसान : शासकीय मदतीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कआकोली : बोरखेडी तलावाच्या नादूरूस्त पाटचऱ्या व पाणी वापर संस्थेच्या लहरीपणाचा फटका परिसरातील शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. नादूरूस्त पाटचºयांमुळे सिंचनासाठी सोडलेले पाणी थेट मदना येथील एका शेतकºयाच्या शेतात शिरल्याने त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याला शासकीय मदत देण्यात यावी, अशी मागणी आहे.मदना येथील शेतकरी शंकर विठ्ठल तामखाने याच्या शेताजवळ जलाशयाचे गेट क्रमांक चार आहे. या गेटमधून शेतकºयांना सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले. परंतु, पाटचऱ्यांची वेळीच दुरूस्ती न करण्यात आल्याने सोडण्यात आलेले पाणी थेट तामखाने यांच्या शेतात शिरले. यामुळे शेताला तळ्याचे स्वरूप आले आहे. या प्रकारामुळे त्यांच्या शेतातील तीन एकरातील कपाशी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शिवाय काही झाडांना कापूस लागून असताना कापूस वेचताना चिखल तुडवावा लागत आहे. या प्रकारामुळे शेतकरी शंकर तामखाने यांच्या अडचणीत वाढ झाली असून संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सर्वेक्षण करून तात्काळ शासकीय मदत देण्याची मागणी आहे.पाणी वापर संस्थेचेही दुर्लक्षपाणी वापर संस्थेच्या अध्यक्षांसह संबंधितांना वारंवार परिसरातील शेतकऱ्यांनी धरणातून पाणी सोडण्याबाबतची माहिती शेतकऱ्यांना देण्यात यावी असे सांगितले. परंतु, संस्थेच्यावतीने मनात येईल तेव्हा पाणी सोडल्या जाते शिवाय त्यांच्या या मनमर्जी कामाला पाटबंधारे विभागाचे अधिकारी साथ देत असल्याची परिसरात ओरड आहे. शेतकरी हितार्थ निर्णय घेत अंमलबजावणी करण्याची मागणी आहे.कालव्याचे पाणी शेतात शिरल्यामुळे आपले मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत आपण अध्यक्षांना माहिती दिली. परंतु, ते आमदार, खासदाराकडे जाण्याचा सल्ला देत आपली जबाबदारी झटकत आहेत. सदर प्रकारामुळे आल्यावर आत्महत्येचीच वेळ आली असून संबंधितांनी तात्काळ योग्य कार्यवाही करावी.- शंकर तामखाने, शेतकरी, मदना.