शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

कामगारांच्या प्रश्नावर संयुक्त बैठक बोलवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 22:30 IST

मोहता मिल अ‍ॅन्ड व्हिवींग अ‍ॅन्ड स्पिनींग मिल मधील कामगारांच्या प्रश्नासंदर्भात संयुक्त बैठक बोलावून कामगारांचे प्रश्न मार्गी लावावे, अशी मागणी अप्पर आयुक्त नागपूर यांच्याकडे माजी आमदार राजू तिमांडे यांनी केली आहे.

ठळक मुद्देराजू तिमांडे यांची अप्पर कामगार आयुक्तांकडे मागणी : मोहता मिलमधील प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : मोहता मिल अ‍ॅन्ड व्हिवींग अ‍ॅन्ड स्पिनींग मिल मधील कामगारांच्या प्रश्नासंदर्भात संयुक्त बैठक बोलावून कामगारांचे प्रश्न मार्गी लावावे, अशी मागणी अप्पर आयुक्त नागपूर यांच्याकडे माजी आमदार राजू तिमांडे यांनी केली आहे. मोहता मिल हिंगणघाटला १२० वर्ष पूर्ण होत आहे. या मिलमध्ये व्हिवींग अ‍ॅन्ड स्पिनिंग, प्रोसेसिंग युनिट सुरू झाले आहे. या मिलमध्ये तीन पाळ्यात कामगार काम करतात. जवळ-जवळ १२०० ते १३०० कामगार २०१५ पर्यंत काम करीत होते. तसेच ठेकेदारीमध्ये जवळपास २०० कामगार काम करतात. १ मार्च २०१७ पासून मोहता मिलच्या व्यवस्थापनाने कपडा खाता बंद केला आहे. त्यामुळे ४५० कामगार कमी झाले. या मिलचा माल विदेशात पाठविला जातो. कामगारांचे विविध प्रश्न प्रलंबित आहे. यामध्ये राष्ट्रीय मिल मजदूर संघ, हिंगणघाटची निवडणूक जुन्या घटनेप्रमाणे घेण्यात यावी. ठेकेदारी पद्धत बंद करून नवीन भरती करण्यात यावी. बदली कामगारांना कायम करण्यात यावे. कामगारांना सुट्या देण्यात याव्या. बदली कामगारांना काम देण्यात यावे. तांत्रिक अडचणीमुळे मशीन बंद असेल तर कामगारांना लेआॅफ देण्यात यावा, ओव्हरटाईम करणाऱ्या कामगारांना डबल पगार देण्यात यावा. मशीनच्या चुकीमुळे माल खराब झाला किंवा फाटला तर त्याची जबाबदारी कामगारांवर राहणार नाही. तसेच कामगारांना काम करताना चष्मा, जोडे, कापड, हॅन्डक्लोज या वस्तू देण्यात याव्या. फॅक्टरी अ‍ॅक्टप्रमाणे सुविधा देण्यात याव्या. स्पिनींग विभागात मशीनची स्पिड व्यवस्थित ठेवण्यात यावी, आदी मागण्याचे निवेदन तिमांडे यांनी अप्पर आयुक्त यांना सादर केले. व या सदंर्भात बैठक बोलावण्याची मागणी त्यांनी केली.मीलमधील कर्मचाऱ्यांना स्वेच्छा निवृत्ती द्याकपडा खाता विभाग बंद करताना ४५० कामगारांन स्वेच्छा निवृत्ती मंजूर करून देणे आवश्यक होते. परंतु त्याआधी व्यवस्थापने कपडा खात्यातील ६८ कामगारांना स्वेच्छा निवृत्ती देण्याचा निर्णय घेतला. कामगारांचे हित लक्षात घेवून उर्वरित कामगारांना स्वेच्छा निवृत्ती घेण्याबाबत आदेश देण्यात यावे, अशी मागणी तिमांडे यांनी केली आहे.