शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

अधिकृत कृषी केंद्रांतूनच बियाण्यांची खरेदी करा

By admin | Updated: June 8, 2015 02:31 IST

रासायनिक खते, बियाणे व कीटकनाशक खरेदी करताना शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शासनमान्य कृषी निविष्ठाचा विक्री परवाना ...

वर्धा : रासायनिक खते, बियाणे व कीटकनाशक खरेदी करताना शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शासनमान्य कृषी निविष्ठाचा विक्री परवाना असलेल्या कृषी केंद्रातूनच रासायनिक खत, बियाणे व कीटकनाशक खरेदी करावी, असे आवाहन जिल्हा कृषी अधिकारी यांनी केले आहे. बोगस व बेकायदेशीर बियाणांच्या उत्पादनास व विक्रीस शासनाची परवानगी नसते. अशा बियाण्यांच्या उत्पन्नासंबंधी खोटे दावे करून शेतकऱ्यांना अमिष दाखविण्यात येते. व्यवहारामध्ये शासनमान्य दराचे अधिकृत बिल शेतकऱ्यास दिले जात नाही. पाकिटावर बियाण्याच्या गुणवत्तेचा तपशील व कोणत्याही तंत्रज्ञानाचा उल्लेख नसतो. बियाणांच्या परीक्षणपूर्व वापरामुळे जर शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले तर त्यासाठी नुकसान भरपाईची हमी शासन किंवा ग्राहकमंच सुद्धा घेवू शकत नाही. रासायनिक खत, बियाणे व कीटनाशक खरेदी करताना अधिकृत व परवानाधारक विक्रेत्याकडूनच बियाणे खरेदी करावे, रासायनिक खते, बियाणे व कीटनाशक खरेदी करताना पक्क्या बिलाचाच आग्रह धरा, विक्रेते पक्के बिल देण्यास नकार देत असल्यास किंवा इतर कुठलीही शंका, तक्रार असल्यास कृषी विभागाला कळवा बिलावर खरेदी केलेल्या बियाणांच्या गुणवत्तेचा संपूर्ण तपशील नोंदविलेला आहे किंवा नाही याची खात्री करावी. खरेदी केलेल्या बियाण्यांचे पाकीट सीलबंद, मोहोरबंद तथा लेबलसह असल्याची खात्री करावी, बियाणांच्या उगवण क्षमतेची अंतिम मुदतीची तारीख पाहूनच पाकीट, बॅग खरेदी करा. एमआरपीपेक्षा जास्त किंमतीने विक्री होत असल्यास त्वरीत कृषी विभागाकडे तक्रार नोंदवावी, रासायनिक खत खरेदी करताना बॅगेवरील एमआरपी किंमत बघूनच खरेदी करावी.सद्यस्थितीत जिल्ह्यामध्ये सर्व प्रकारच्या बियाणे, खत मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांनी विशिष्ठ वाणांचा तुटवडा असल्याच्या अफवांवर विश्वास ठेऊ नये. कोणत्याही अप्रचारावर विश्वास न ठेवता परवानाधारक विक्रेत्यांकडूनच कृषी निवीष्ठा खरेदी कराव्यात. तसेच काही कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या प्रलोभनावर विश्वास ठेऊ नये. जिल्ह्यात कोणतीही व्यक्ती अथवा संस्था बेकायदेशीर पद्धतीने बोगस बियाणांची, खताची विक्री करताना आढळल्यास त्याच्याविरुद्ध कार्यवाही केली जाईल असेही सांगण्यात येत आहे.(शहर प्रतिनिधी)