शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
2
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
3
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
4
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
5
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
6
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
7
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
8
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
9
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
10
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
11
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
12
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
13
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
14
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
15
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
16
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
17
सातपाटी किनाऱ्यावर १७ वर्षीय मुलाचा समुद्रात बुडून मृत्यू, पाच मित्र बचावले!
18
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
19
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
20
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...

११ लाख क्विंटल कापसाची खरेदी

By admin | Updated: February 9, 2016 01:46 IST

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या खासगी कापूस यार्डमध्ये ३१ जानेवारीपर्यंत आलेली आवक ११ लाख क्विंटलच्यावर गेली आहे.

हिंगणघाट बाजार समितीचा विक्रम हिंगणघाट : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या खासगी कापूस यार्डमध्ये ३१ जानेवारीपर्यंत आलेली आवक ११ लाख क्विंटलच्यावर गेली आहे. मागील वर्षीचा याच कालावधीतील विक्रम मोडीत १ लाख ७० हजार क्विंटल कापसाची अधिक आवक झाल्याची माहिती बाजार समितीच्यावतीने देण्यात आली आहे. या बाजार समितीने शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवून विदर्भातील तसेच आंध्रप्रदेशातील शेतकऱ्यांना आकृष्ट करून मोठ्या प्रमाणावर आवक वाढविली. एका रुपयात जेवण, मार्केट यार्डमध्ये रोख चुकारा, मोजमापांवर नियंत्रण, शहर वाहतुकीची सोय, कापसाची थेट विक्रीचा दलालमुक्त पर्याय उपलब्ध असल्याने येथे कापसाची आवक झाल्याची माहिती देण्यात आली आहे. येथे राबविण्यात येत असलेल्या योजनांमुळे विदर्भातील चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती आणि नागपूरसह आंध्रप्रदेशातील शेतकऱ्यांद्वारे येथे कापूस विकावयास आणल्या जातो. यावर्षीच्या सुरुवातीच्या हंगामात कापसाला ४ हजार रुपये क्विंटल दराने सुरुवात झाली. दरात वाढ होवून हा दर ४८०० पर्यंत वाढला. आता सध्या ४६०० रुपये प्रति क्विंटल सर्वोच्च दर आहे. मागील वर्षीच्या हंगामात हिंगणघाटच्या बाजारपेठेत एकूण १६ लाख ५७ हजार क्विंटलची कापसाची आवक झाली होती. सध्याची ३१ जानेवारी पर्यंतची आवक याच कालावधीच्या तुलनेत १ लाख ७० हजार क्विंटलने अधिक आहे. ही आवक अशीच सुरू राहिल्यास मागील वर्षीचा विक्रम मोडल्यास नवल राहणार नाही. या बाजार समितीने अनेक योजना राबविल्याने अनेक शेतकरी आकृष्ट झाले असून मोठ्या प्रमाणावर आवक होत आहे. या बाजार समितीच्या नावावर नवनव्या विक्रमांची नोंद होत असून विदर्भातील नावलौकीक प्राप्त झालेली ही बाजार समिती ठरली आहे. बाजार समितीचे सभापती आणि संचालक मंडळांनी राबविलेल्या यशस्वी योजनांमुळे हे शक्य झाले आहे.(शहर प्रतिनिधी)