शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

पंचाळा गावात पोहोचली परिवहन महामंडळाची बस

By admin | Updated: April 27, 2017 00:46 IST

डोंगरमाथ्यावर वसलेल्या ४५० लोकसंख्येच्या पंचाळा या आदिवासीबहुल गावात आजवर बस पोहचली नव्हती.

स्वातंत्र्य प्राप्तीनंतर गावाला प्रथमच मिळाली बससेवा आष्टी (शहीद) : डोंगरमाथ्यावर वसलेल्या ४५० लोकसंख्येच्या पंचाळा या आदिवासीबहुल गावात आजवर बस पोहचली नव्हती. गावात जाण्यासाठी रस्ता झाल्यावर बसची येत नसल्याने गावकऱ्यांना पायपीट करावी लागत. ग्रामस्थांनी वारंवार मागणी केल्यावर लोकप्रतिनिधींनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केल्यावर अखेर पंचाळा गावात बससेवा सुरू झाल्याने गावकऱ्यांना दिलासा मिळाला. तालुक्यातील पोरगव्हाण, पंचाळा, झाडगाव, टुमणी ही गावे आतील भागात आहे. या गावात जाण्यासाठी रस्ता नव्हता. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून आष्टी ते पोरगव्हाण या रस्त्याच्या पहिला टप्पा पूर्ण करण्यात आला. दुसरा टप्पा आष्टी, पंचाळा, झाडगाव, टुमणी असा रस्ता तयार केला. यामुळे येथील गावकऱ्यांना तालुकास्थळी जोडणे सुलभ झाले. सदर गावे शेतीवर शंभर टक्के अवलंबून आहे. त्यांना रोजगाराचा अन्य पर्याय नाही. शेतमाल विक्रीसाठी आणायचा असल्यास रस्त्याअभावी गैरसोय होत होती. आता रस्ता झाल्याने हा प्रश्न सुटला आहे. गावात जायला रस्ता नसल्याने महामंडळाची बस येत नव्हती. मात्र रस्ता झाल्यावर बस येत नसाल्याने गावकऱ्यांनी तसेच विद्यार्थ्यांनी बससेवा सुरू करण्याची मागणी केली होती. माजी आमदार दादाराव केचे यांच्याकडे निवेदन देण्यात आले. केचे यांनी वर्धा विभागाच्या व्यवस्थापकांना पंचाळा गावाला जाणारी बस सुरू करण्याची मागणी केली. तसेच बससेवा सुरू होईपर्यंत सतत पाठपुरावा केला. अखेर बससेवा सुरू झाल्यामुळे गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. सकाळी व सायंकाळी या दोन वेळेत बससेवा सुरू केली असून शिक्षणासाठी बाहेरगावी जोणाऱ्या विद्यार्थ्यांची यामुळे सोय झाली आहे. शासनाच्या योजना गावात पोहचल्यास विकास करणे सुलभ होते, असे सरपंच श्रीराम नेहारे यावेळी म्हणाले. पंचाळा गावाला बस सुरू झाल्याबद्दल लोकप्रतिनिधी यांच्यासह गावकऱ्यांनी परिवहन महामंडळाचे आभार मानले आहे. शासनाने पाणी पुरवठ्यासाठी येथे कायमस्वरुपी व्यवस्था करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली.(तालुका प्रतिनिधी)