शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅव्हल्सची बसला धडक ११ प्रवासी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 21:25 IST

नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील शेडगाव चौरस्ता परिसरात भरधाव ट्रॅव्हल्सने रापमच्या बसला धडक दिली. या अपघातात अकरा प्रवासी जखमी झाले असून त्यात नऊ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ही घटना सोमवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देशेडगाव शिवारातील घटना : जखमीत विद्यार्थ्यांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील शेडगाव चौरस्ता परिसरात भरधाव ट्रॅव्हल्सने रापमच्या बसला धडक दिली. या अपघातात अकरा प्रवासी जखमी झाले असून त्यात नऊ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ही घटना सोमवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास घडली.प्राप्त माहितीनुसार, रापमच्या वर्धा आगाराची एम.एच. १४ बी.टी. १२५२ क्रमांकाची बस वर्धेकडून समुद्रपूरच्या दिशेने जात होती. ही बस शेडगाव चौरस्ता परिसरात रस्ता ओलांडत असताना चंद्रपूरकडून नागपूरच्या दिशेने जात असलेल्या एम. एच. ३४ ए.व्ही. १२७७ क्रमांकाच्या ट्रॅव्हल्सने या बसला जबर धडक दिली.या अपघातात समुद्रपूर येथील शाळेत जात असलेल्या अपेक्षा घुसे, रश्मी घुसे, मयुरी डफ, मयुरी तडस, वैशाली भगता, अंजली तडस, वैष्णवी जोगे, वैष्णवी काटगुबे सर्व रा. मांडगाव तसेच लता शास्त्रकार, बाबा शास्त्रकार दोन्ही रा. भुगाव आणि नागपूर येथील रामा विनायक बांधेकर हे जखमी झाले.अपघाताची माहिती मिळताच जाम पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत कºहाडे, बंडु डडमल, दिनेश धवने, नागेश तिवारी, किशोर येळणे, देवेंद्र पुरी, चंदु बन्सोड यांनी घटनास्थळ गाठून दोन्ही अपघातग्रस्त वाहन ताब्यात घेतली. शिवाय जखमींना मिळेल त्या वाहनाने रुग्णालयाकडे रवाना केले. या घटनेची नोंद समुद्रपूर पोलिसांनी घेतली असून पुढील तपास समुद्रपूर पोलीस करीत आहेत.वाहतूक खोळंबलीभरधाव ट्रॅव्हल्सने रापमच्या बसला धडक दिल्याने झालेल्या अपघातात अकरा जण जखमी झाले. अपघातानंतर ही दोन्ही वाहने रस्त्याच्या मधोमध राहिल्याने दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. घटनास्थळावर पोहोचलेल्या पोलिसांनी दोन्ही अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्याकडेला करून खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली.शेडगाव चौरस्ता धोक्याचाचशेडगाव चौरस्ता परिसरात यापूर्वीही अनेक अनघात झाले असून शेकडो जणांना त्यात आपले प्राण गमवावे लागले आहे. इतकेच नव्हे तर काही जणांना कायमचे अपंगत्त्व आले आहे. शेडगाव चौरस्ता परिसर हा धोक्याचा असून येथे सुरक्षेच्या दृष्टीने कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे. परंतु, जिल्हा प्रशासनही उड्डाण पुलाच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यातच धन्यता मानत आहे. विशेष म्हणजे तत्कालीन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या नेतृत्त्वात रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीदरम्यान जिल्ह्यातील ब्लॅक स्पॉटवर सुरक्षेच्या दृष्टीकोणातून उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यावेळी काही प्रमाणात कामही झाले. परंतु, ते अपुरेच पडत आहे. त्यामुळे नवीन जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे.