शहरातील घटना : सीसीआयचा कापूस स्वाहावर्धा : मोहता जिनिंगमध्ये आग लागल्याने अंदाजे १५० च्या वर कापूस गाठी जळाल्या. यात नुकसानाचा नेमका आकडा कळू शकला नाही. नगर परिषद व उत्तम गलवा कंपनीच्या अग्निशमन दलाने वेळीच आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठे नुकसान टळले. ही घटना गुरूवारी दुपारी १ च्या सुमारास घडली.शहर पोलीस ठाण्याच्या समोर पणन महासंघाच्या कार्यालयाजवळ असलेल्या मोहता जिनिंग प्रेसिंगमध्ये सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र आहे. शिवाय व्यापारी व मोहता जिनिंगकडूनही कापूस खरेदी केली जाते. तिघांद्वारेही खरेदी केलेला कापूस मोहता जिनिंगमध्ये ठेवला जातो. याच जिनिंगमधील एका शेडमध्ये ठेवलेल्या सीसीआयच्या कापसाला गुरूवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. यात सुमारे १५० च्या कापूस गाठी जळून खाक झाल्या. आग लागल्याचे निदर्शनास येताच नगर परिषद आणि उत्तम गलवा मेटॅलिक कंपनीच्या अग्निशमन दलास तसेच शहर पोलिसांना सूचना देण्यात आली. १.३० च्या सुमारास अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. काहीच वेळेत आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले; पण कापसात धग कायम होती. दरम्यान, चांगला कापूस काढून घेण्याचे प्रयत्न करण्यात आले. याबाबत सीसीआयचे देशमुख यांना विचारणा केली असता त्यांनी किती कापूस जळाला, किती नुकसान झाले, हे सांगण्यास असमर्थता दर्शविली. आगीचे कारणही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. शहर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करीत नोंद घेतली.(कार्यालय प्रतिनिधी)
मोहता जीनमध्ये आग १५० वर गाठी जळाल्या
By admin | Updated: December 25, 2015 02:46 IST