शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

गोहदा-सालई (पेवठ) रस्त्याला झुडपांचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 00:48 IST

अवघा एक ते दीड कि़मी. अंतराचा असलेला गोहदा-सालई (पेवठ) या मार्गाचे काही वर्षांपूर्वी डांबरीकरण करण्यात आले. परंतु, सदर रस्त्याच्या दुतर्फा झुडपांचा विळखा असल्याने वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा ......

ठळक मुद्देअपघाताची भीती : संबंधीतांनी लक्ष द्यावे,नागरिकांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कघोराड : अवघा एक ते दीड कि़मी. अंतराचा असलेला गोहदा-सालई (पेवठ) या मार्गाचे काही वर्षांपूर्वी डांबरीकरण करण्यात आले. परंतु, सदर रस्त्याच्या दुतर्फा झुडपांचा विळखा असल्याने वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. समोरून येणारे वाहन सहज दिसत नसल्याने अपघाताची भीती बळावत असून तात्काळ योग्य कार्यवाहीची मागणी आहे.रस्त्याच्या कडेला असलेले झुडपे तसेच खचलेला नाल्यावरील पुल अपघाताला आमंत्रण देत आहे. याकडे स्थानिक ग्रा.पं. प्रशासनासह सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देण्याची गरज आहे. हिंगणी-माळेगाव(ठेका) या मुख्य मार्गाला गोहदा-सालई (पे.) मार्ग मिळतो. नुकतेच डांबरीकरण करण्यात आल्याने सध्या स्थितीत रस्ता गुळगुळीत आहे. परंतु, रस्त्याच्या कडेला वाढलेल्या झुडपांमुळे वळण मार्गावर इतर वाहनचालकांना सामोरुन येणाºया वाहनाचा अंदाज सहज येत नाही. रस्त्याच्या कडेला असलेली वाढलेली झुडूपे मोठ्या अपघाताला निमंत्रण देत असल्याने सदर प्रकरणी संबंधीतांनी तात्काळ योग्य पाऊल उचलून उपाययोजना कराव्या, अशी मागणी वाहनचालकांसह नागरिकांची आहे.तीन वर्षांपासून पुलाचे भगदाड बुजविले नाहीसालई(पेवठ) गावाला पाणी पुरवठा करणाºया विहीरी लगत असलेल्या नाल्यावरील पुलाला भगदाड पडले आहे. गत तीन वर्षापासून हा पुल नादुरुस्त आहे. वारंवार संबंधीतांना माहिती देऊनही दुर्लक्ष केले जात असल्याची परिसरात ओरड आहे. पुलाचे भगदाड सहज दिसत नसल्याने अपघात बळावत आहे.