शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

७५ वर्ष जुन्या अतिक्रमणावर बुलडोजर फिरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 23:11 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक नगर परिषद कार्यालय ते आठवडी बाजार चौकापर्यंत अतिक्रमणात असलेल्या ११ दुकानांवर बुलडोजर चालविण्यात आला. ७५ वर्षाचा वारसा व आठवडी जोपासलेल्या या जागेवरील अतिक्रमण, अवघ्या दोन तासात जमीनदोस्त करण्यात आले.

ठळक मुद्देआठवडी बाजार चौकातील ११ दुकाने पाडली : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी

ऑनलाईन लोकमतदेवळी : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक नगर परिषद कार्यालय ते आठवडी बाजार चौकापर्यंत अतिक्रमणात असलेल्या ११ दुकानांवर बुलडोजर चालविण्यात आला. ७५ वर्षाचा वारसा व आठवडी जोपासलेल्या या जागेवरील अतिक्रमण, अवघ्या दोन तासात जमीनदोस्त करण्यात आले. न.प.ची बाजू ग्राह्य धरुन न्यायालयाने हा निर्णय दिला होता. याप्रसंगी कुठलीही अनुचित घटना घडू नये याकरिता चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.गत काही वर्षांपासून स्थानिक नगर परिषद व अतिक्रमणात असलेल्या दुकानदारांमध्ये कायद्याची लढाई सुरू होती. मुख्य बाजार चौकात या दुकानांचे अतिक्रमण असल्याने शहराच्या दर्शनी भागाच्या सौंदर्यीकरणसाठी अडचण निर्माण झाल्याचा नगर परिषदेचा युक्तीवाद होता. त्यामुळे स्थानिक पालिकेच्यावतीने संबंधित अतिक्रमण काढण्यासाठी न्यायालयाच्या माध्यमातून पाठपुरावा चालविला होता. अतिक्रमण धारकांनी सुद्धा पालिकेच्या या कारवाईच्या विरोधात जिल्हा सत्र न्यायालय, उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालयापर्यंत या प्रकरणाला हवा देवून न्यायाची अपेक्षा केली होती.सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात १९ सप्टेंबर २०१७ रोजी आदेश पारीत करून संबंधित अतिक्रमण काढण्याचे निर्देश दिले होते. अतिक्रमण धारकांच्या विनंतीनुसार पर्यायी व्यवस्था होईपर्यंत ३१ जानेवारी पर्यंतची मुदत देण्यात आली होती. न.प. मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे व पोलीस निरीक्षक दिलीप ठाकुर यांच्या मार्गदर्शनात दोन जेसीबीच्या सहाय्याने ही अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यात आली. कोणताही अनुचित प्रकार न घडता ही मोहीम फत्ते करण्यात आली.या कारवाई दरम्यान दादाराव मून, सुशील हावरे, मुकुंद बजाईत, शेख हबीब, अब्दुल रहीम, गोविंद गोमासे, सुरेश सोनकुसळे, शेख गफ्फार शेख अजीज, लक्ष्मण घोडखांदे, संजय घोडे, सतीश खंडाळकर, सुनीता चकोले या व्यावसायिकांची दुकाने पाडण्यात आली. याप्रसंगी मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती.