शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

सामूहिक शेततळे अन् सोलरपंप ठरले भरभराटीचे साधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 23:02 IST

सन २०१५ चा आॅक्टोबर महिना. पावसाच्या कमतरतेमुळे मदनी या गावातील शेतकऱ्याने १५ एकर सोयाबीनवरून नांगर फिरवला. या घटनेमुळे जिल्ह्यातील कृषी विभागात चांगलीच खळबळ उडाली होती; पण त्याच शेतकऱ्यासाठी २०१८ चा आॅक्टोबर महिना सुखद ठरत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सन २०१५ चा आॅक्टोबर महिना. पावसाच्या कमतरतेमुळे मदनी या गावातील शेतकऱ्याने १५ एकर सोयाबीनवरून नांगर फिरवला. या घटनेमुळे जिल्ह्यातील कृषी विभागात चांगलीच खळबळ उडाली होती; पण त्याच शेतकऱ्यासाठी २०१८ चा आॅक्टोबर महिना सुखद ठरत आहे. आज त्यांच्या शेतात १५ एकरवर फळबाग बहरली आहे. केवळ एका पावसामुळे नांगर फिरवावा लागणाऱ्या त्यांच्या शेतीत ही किमया केली ती सामूहिक शेततळे आणि सोलरपंपाने.वर्धा तालुक्यातील मदनी गावातील माधव वानखेडे या शेतकऱ्यांकडे २५ एकर शेती जिराईत होती. २०१५ मध्ये जिल्ह्यात कोरडा दुष्काळ होता. त्या दुष्काळाचा फटका सिंचनाची कोणतीही व्यवस्था नसणाºया आणि विद्युत जोडणी नसणाºया वानखेडे सारख्या शेतकºयांना बसला. त्यांनी त्यांच्या १५ एकर सोयाबीनचे पीक नांगरले. यावेळी वानखेडे यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन शेततळे देण्याची मागणी केली. माधव वानखेडे यांनी सामूहिक शेततळ्याचा लाभ घेतला.५६ मीटर, ४५ मीटर, ५.५ मीटर असे मोठे सामूहिक शेततळे तयार केले. तसेच शासनाच्या सौर कृषीपंप योजनेमधून त्यांना  ७.५ एचपी सोलरपंपचाही लाभ मिळाला. त्यांच्याकडे पाणी आणि विद्युत अशा दोन्ही सुविधा उपलब्ध झाल्यावर त्यांनी जिराईत शेती संपूर्णपणे ओलीताखाली आणली. ५ एकरात केळी आणि ८ एकरमध्ये डाळिंबाची लागवड केली. तसेच आंतरपीक म्हणून सोयाबीन आणि हरभरा या पिकांचेही त्यांनी उत्पादन घेतले. मागील वर्षी केळीच्या उत्पादनातून त्यांना ९ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. खर्च वजा जाता ५ लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. तसेच सोयाबीन आंतरपिकातून १.५० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. तर डाळिंबाचे उत्पन्न यावर्षी पासून सुरू होत आहे. मुख्य म्हणजे पाण्याची बचत करण्यासाठी त्यांनी फळबागेला ठिबक सिंचन पद्धतीचा वापर केला. सामूहिक शेततळ्यामुळे सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले.सोलरपंपामुळे माझी विजेची आणि पैशाची बचत होत आहे. शिवाय पिकांना वेळेत पाणी मिळाल्यामुळे उत्पन्नातही भर पडली. लोड शेडिंगमुळे रात्री अपरात्री शेतात पाणी द्यायला जाण्याची आता गरज पडत नाही.- माधव वानखेडे, शेतकरी, मदनी.