शहरं
Join us  
Trending Stories
1
अयोध्येमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट, घर कोसळून ५ जणा्ंचा  मृत्यू, अनेक जण अडकल्याची भीती  
2
ओवेसींच्या सभेतून वारिस पठाण यांचं नितेश राणेंना आव्हान, म्हणाले, ‘दोन पायांवर येशील, पण…’ 
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या गळ्यात शांततेचं नोबेल, नेतन्याहू यांनी शेअर केला असा फोटो, म्हणाले…
4
"सामाजिक विषमता निर्माण करण्याला शरद पवार जबाबदार', मनोज जरांगेंच्या भेटीनंतर राधाकृष्ण विखेंचा आरोप 
5
आठव्या क्रमांकाच्या बॅटरनं वाचवलं; पण तोच डाव उलटा फिरला!.. अन् टीम इंडियासमोर आफ्रिकेनं मारली बाजी
6
'हो, ते प्रवासी विमान आम्ही पाडलं होतं', अनेक महिन्यांनंतर व्लादिमीर पुतीन यांची कबुली
7
मनात नसताना रोहित-विराट 'तो' निर्णय घेणार? मोठी माहिती आली समोर
8
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला शरद पवारांचे खासदार निलेश लंकेंनी दिल्लीत गाठले; त्यानंतर...
9
महिलेने रडत रडत केला फोन, पोलिसांना सांगितलं पतीचं गुपित, घराची झडती घेताच बसला धक्का 
10
क्रिकेटच्या मैदानात AI ची ‘बोलंदाजी’! मिताली राजनं पिच रिपोर्टसाठी घेतली गुगल ‘जेमिनी’ची मदत, अन्...
11
आता भारतातच मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण; ब्रिटनची 9 विद्यापीठे उघडणार कॅम्पस
12
UNSC मध्ये भारताला ब्रिटनचा पाठिंबा! मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब; खलिस्तानवाद्यांवर कारवाईची मागणी
13
रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत सापडली महिला; शुद्धीवर आल्यावर सांगितलं असं; ऐकून सगळेच चक्रावले!
14
शाब्बास रिचा! सेंच्युरी हुकली; पण 'नॉट रिचेबल' वाटणारा टप्पा गाठला अन् मोठा डावही साधला
15
रावळपिंडी चिकन टिक्का, बहावलपूर नान, तर..., हवाई दलाच्या मेन्यू कार्डमधून पाकिस्तानची खिल्ली
16
शुभमन गिलच्या कर्णधारपदावर सौरव गांगुलींचे मोठे विधान, म्हणाला...
17
वारंवार मागणी केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळेल? शर्यतीत कोण? जाणून घ्या...
18
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
19
रोहित पवारांच्या मातोश्रींकडून गुंड निलेश घायवळचे कौतुक; सचिन घायवळसोबतचेही फोटो आणले समोर
20
Crime: एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला, ५०० सीसीटीव्हीच्या मदतीने हल्लेखोराला अटक

बुद्ध धम्म ही भारताची संजीवनी

By admin | Updated: February 7, 2016 00:13 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अमृत रुपाने बुद्ध धम्म आम्हाला दिला. त्यामुळे नीतिमत्ता आली. सामान्यांमध्ये ही नीतिमत्ता रुजविण्यासाठी बुद्ध धम्मदीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.

विमलकीर्ती गुणसरी : धम्मदीक्षा समारोहात हजारो नागरिक सहभागीवर्धा : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अमृत रुपाने बुद्ध धम्म आम्हाला दिला. त्यामुळे नीतिमत्ता आली. सामान्यांमध्ये ही नीतिमत्ता रुजविण्यासाठी बुद्ध धम्मदीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. बुद्ध धम्म या देशाची संजीवनी आहे. अज्ञानाकडून प्रकाशाकडे नेण्याचा एकमेव मार्ग म्हणजे धम्मदीक्षा होय असे विचार भदंत विमलकीर्ती गुणसरी यांनी व्यक्त केले. डॉ. आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती पर्वात समता, स्वातंत्र्य, बंधुत्व व न्यायाच्या सामाजिक वातावरण निर्मितीकरिता संथागार, मास्टर कॉलनी, सावंगी (मेघे), वर्धा येथे बुद्ध धम्मदीक्षा समारोह हजारो लोकांच्या उपस्थितीत घेण्यात आला. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी विजय मेश्राम, ई. झेड. खोब्रागडे, डॉ. एम. एल. कासारे, डॉ. सुभाष खंडारे, जि. प. उपाध्यक्ष विलास कांबळे उपस्थित होते. मार्गदर्शनात गुणसारी म्हणाले, या देशात जोपर्यंत जातिभेद आहे, तोपर्यंत माणूस माणसापासून दूर आहे. माणसातील भेद नष्ट व्हायचे असेल तर प्रत्येक माणसाने एकसंघ होऊन समाज व देशाच्या विकासासाठी प्रयत्न केले पाहिजे मत त्यांनी व्यक्त केले. विजय मेश्राम यांनी बाबासाहेबांच्या कल्पनेतील भारतीय कसे विकास पावतील याविषयी मार्गदर्शन केले. ई.झेड. खोब्रागडे, देशाचे संविधान व व सर्वसामान्यांची जबाबदारी यांचा समन्वय साधने आवश्यक आहे. बुद्ध धम्मदीक्षा घेऊन जातीविरहीत समाज निर्माण व्हावा अशी गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी परिसरातील सर्व प्रतिनिधींनी सहकार्य केले. कार्यक्रमामध्ये सुरुवातीला स्मृतिगंध म्युझिकल ग्रुप यांनी श्रद्धायुक्त व प्रेरणादायी गीतांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. बुद्ध धम्मदीक्षा समारोह समितीमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा मोठा सहभाग होता. कार्यक्रमाचे संचालन महेंद्र रत्नबोधी व उज्ज्वला तेलंग यांनी केले आभार आर.एम.पाटील यांनी मानले. यशस्वीतेकरिता एन. एस.पाटील, ओमप्रकाश घोटेकर, दादाराव जंगले, आर. एम. पाटील, एम. जे. तागडे, गौतम भगत, नागार्जुन जिनसेन, शुभमचित्त गुणदर्शी, रवी पानबुडे, जी. एन. भालेराव, अतुल पाटील, ग्रा. पं. सदस्य महेंद्र गेडाम, गीता पाटील, टी.व्ही. राऊत, डॉ. प्रवीण वानखेडे, डॉ. रवींद्र वानखेडे, खुशाल पाटील, बबन वाघमारे, यशवंत भानसे, सरला जंगले, धम्मपाल कांबळे, रवी लभाने, अनिल बाभळे, मनीषा ब्राह्मणे, प्रतिभा बहादुरे, मंजुषा सुभाषित, राजु थुल, घननीळ थुल, वसंत गायकवाड, समर्थ गोडघाटे, केवल मेश्राम, रंजना गोडघाटे, अस्मिता चहारे यांनी सहकार्य केले.(शहर प्रतिनिधी)