शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या राजकीय कारकिर्दीत मी पाहिलेले पहिले हतबल मुख्यमंत्री म्हणजे उद्धव ठाकरे; बावनकुळेंची टीका
2
"उद्धवजी, हंबरडा राखून ठेवा, महापालिकेतील पराभवानंतर तुमच्या..."; शेलारांचे ठाकरेंना उत्तर
3
वयाने लहान तरुणाला घरी बोलावून ठेवायची शारीरिक संबंध, मग केली हत्या, महिलेला अटक
4
या उद्योगातील ५० हजार नोकऱ्या धोक्यात! हळूच जातील जॉब; हा आहे कंपन्यांचा प्लान
5
"राहुल गांधींची जशी अमेठीमध्ये अवस्था झाली होती, तशीच तेजस्वी यादवांची..."; प्रशांत किशोर यादवांच्या बालेकिल्ल्यातून फुंकणार रणशिंग
6
"पत्नीची हत्या, १३ वर्षांचा कारावास भोगला; बाहेर येताच त्याने..."; आरोपीचे कारनामे कळल्यावर पोलिसही अवाक्
7
सोन्यापासून बनवला सगळ्यात महागडा ड्रेस, तुम्ही बघितला का? वजन १० किलो आणि किंमत...
8
ट्रम्प यांनी चीनवर लादले 100% टॅरिफ; शेअर आणि क्रिप्टो मार्केट कोसळले, $2 ट्रिलियन बुडाले...
9
"मी आरशात बघतो, पण तुम्ही शेतकऱ्यांकडे तरी बघा"; CM फडणवीसांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर
10
नोबेल परत घ्या, मुस्लिम संघटनांनी मारिया कोरिना मचाडो यांच्या विरोधात आंदोलन केले सुरू
11
"...तर दोन्ही उपमुख्यमंत्री साधे मंत्री म्हणून फिरले पाहिजेत"; ठाकरेंचं नियमावर बोट, सरकारला सुनावले खडेबोल
12
मोदींचा ‘तो’ फोटो शेअर करणाऱ्या मामा पगारेंना काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी घेतलं खांद्यावर, केला सत्कार
13
"सत्याने प्रेरीत पण...", 'बॅड्स ऑफ..' वादावर आर्यन खाननं सोडलं मौन; समीर वानखेडे प्रकरणावर म्हणाला...
14
धंगेकरांनी पक्षांतर केले याचे त्यांना भान नाही, ते विसरले आहेत; अजितदादांनी घेतला धंगेकरांचा समाचार
15
पश्चिम बंगाल पुन्हा 'आरजी कर'सारखी घटना; MBBS च्या विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार...
16
'कबुतरांमुळे महायुतीचं सरकार जाईल', शांतीदूत जनकल्याण पार्टी लढवणार मुंबई महापालिका निवडणूक; जैन मुनींनी केली घोषणा
17
IND vs WI 2nd Test Day 2 Stumps: टीम इंडिया पुन्हा तिसऱ्या दिवशीच कॅरेबियन पाहुण्यांचा 'करेक्ट कार्यक्रम' करणार?
18
Diwali Astro 2025: दिवाळीच्या प्रकाशपर्वात भाग्य उजळणार! राशीनुसार पहा आनंद आणि ऐश्वर्य योग!
19
वीरेंद्र सेहवागची पत्नी करतेय बीसीसीआय अध्यक्षांना डेट? सोशल मीडियावर अफवांचं वादळ, तो फोटो ठरतोय कारण
20
भारताच्या शस्त्रांपुढे पाकिस्तानचे काहीच चालणार नाही; कितीही साठा वाढवला तरीही उपयोग नाही

रेतीघाट मजुरांच्या हक्कासाठी बसपाचा मोर्चा

By admin | Updated: February 21, 2016 01:18 IST

रेतीघाटांमध्ये अनैसर्गिक संसाधनांचा अवैधरीत्या वापर केला जात आहे. परिणामी, सुमारे पाच हजार मजुरांवर उपासमारीची वेळ येत आहे.

कारवाईसाठी जिल्हाधिकाऱ्यांना साकडेवर्धा : रेतीघाटांमध्ये अनैसर्गिक संसाधनांचा अवैधरीत्या वापर केला जात आहे. परिणामी, सुमारे पाच हजार मजुरांवर उपासमारीची वेळ येत आहे. रेती घाटावर यंत्रांचा वापर करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करावी, अशी मागणी बहुजन समाज पार्टीच्यावतीने करण्यात आली. शनिवारी याबाबत मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.रेतीघाट मजुरांच्या हक्कासाठी बहुजन समाज पार्टीच्यावतीने शनिवारी धडक मोर्चा काढण्यात आला. सकाळी ११ वाजता कारला चौक पिपरी (मेघे) येथून निघालेला बसपाचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. दरम्यान, न्यायालय परिसरात मोर्चा अडविण्यात आला. यावेळी झालेल्या सभेत बसपाचे जिल्हाध्यक्ष मोहन राईकवार यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. यानंतर शिष्टमंडळामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यात रेती घाटावर यंत्रांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. यामुळे जिल्ह्यातील सुमारे पाच हजार मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. रेती घाटावर पोकलॅण्ड, जेसीबी, डोंग्यांचा वापर केला जात आहे. याद्वारे क्षमतेपेक्षा अधिक उपसा केला जात आहे. परिणामी, नद्यांचे अस्तित्व धोक्यात आले असून निसर्गाचे संतूलन ढळत आहे. रेती घाटावरील मजुरांना न्याय मिळावा म्हणून अवैधरीत्या रेतीचा उपसा करणाऱ्यांवर त्वरित कारवाईकरावी, रस्त्यांचे नुकसान थांबवावे, अशी मागणी करण्यात आली. मोर्चात सुनील डोंगरे, भास्कर राऊत, शेख सलीम, प्रमोद सवई, संजय आत्राम, सुनील हजारे यांच्यासह बसपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले.(कार्यालय प्रतिनिधी)