उपोषणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष : आंदोलकांना न्यायाची प्रतीक्षावर्धा : सिंदी (मेघे) ग्रा.पं. मध्ये गत दहा ते बारा वर्षांपासून कार्यरत नऊ कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात आले. या अन्यायाविरूद्ध बहुजन समाज पार्टीतर्फे गुरूवारी सिंदी मेघे ग्रा.पं. कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.सिंदी (मेघे) ग्रा.पं. चे कर्मचारी भीमसेन कांबळे, राजू येसनकर, पांडुरंग गुरनूले, वसंत वानखेडे, भारत पाटील, गौतम वानखेडे, प्रदीप उरकुडे, प्रमोद गायकवाड व प्रकाश संगळे हे १० ते १२ वर्षांपासून कार्यरत होते. या कर्मचाऱ्यांना पदावरून कमी करण्यात आले. याविरूद्ध ९ नोव्हेंबरपासून पूर्ववत पदावर नियुक्त करण्यासाठी आमरण उपोषण करण्यात येत आहे. त्यांच्या न्याय मागण्या मंजूर व्हाव्या म्हणून बहुजन समाज पार्टीने सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष मोहन राईकवार, उपाध्यक्ष भाष्कर राऊत, प्रमोद सवाई, ओमप्रकाश भालेराव, विजय ढोबळे, मनीष फुसाटे, अनोमदर्शी भैसारे, सुरेश नगराळे, शालीक गवई व पदाधिकारी सहभागी झाले.(कार्यालय प्रतिनिधी)
कार्यमुक्त कर्मचाऱ्यांसाठी बसपाचे धरणे
By admin | Updated: November 20, 2015 02:38 IST