शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

बीएसएनएलची इंटरनेट सेवा ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 23:37 IST

भारत संचार निगम लिमिटेडच्या तालुक्यातील केबल रस्ता बांधकामादरम्यान तुटल्या. यामुळे दोन महिन्यांपासून इंटरनेट सेवा बंद असल्याने शासकीय कार्यालयातील कामाचा खोळंबा झाला आहे. बँकांमधील व्यवहार विस्कळीत झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देरस्ता बांधकामात तुटले केबल : दोन महिन्यांपासून नागरिकांना मनस्ताप

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : भारत संचार निगम लिमिटेडच्या तालुक्यातील केबल रस्ता बांधकामादरम्यान तुटल्या. यामुळे दोन महिन्यांपासून इंटरनेट सेवा बंद असल्याने शासकीय कार्यालयातील कामाचा खोळंबा झाला आहे. बँकांमधील व्यवहार विस्कळीत झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. तातडीने दुरुस्ती करून सेवा सुरळीत करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.तहसील, पोलीस ठाणे, बाजार समिती, बॅँक आॅफ इंडिया, स्टेट बॅँक, पंचायत समिती कार्यालय यासह विविध शासकीय कार्यालये इंटरनेट सेवेने जोडली आहेत. रस्ता बांधकामात केबल तुटल्याने इंटरनेट सुविधा खंडित झाली आहे. घरगुती वापराचे टेलिफोन बंद पडले आहेत. यामुळे दूरध्वनीधारकांनी दुसऱ्या खासगी सेवेला पसंती दिली आहे. बीएसएनएलची केबल लाईन वर्धा येथून आष्टीला जोडण्यात आली आहे. सद्यस्थितीत आर्वी-वर्धा, आष्टी-तळेगाव, आष्टी-साहूर या मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे ठिकठिकाणी केबल खंडित झाले आहे. आष्टीला तालुक्याच्या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना इंटरनेट सुविधेअभावी शासकीय कार्यालयातील कामापासून मुकावे लागत आहे. कारंजा येथील उपविभाग कार्यालयाशी संपर्क साधला असता लाईनची जोडणी सुरू असून लवकरच दुरुस्त करू, असे सांगितले.हा नित्याचाच प्रकारशासनाने बॅँका व इतर सर्व शासकीय कार्यालयांमध्ये बीएसएनएलच्या माध्यमातून इंटरनेट सेवा उपलब्ध केली आहे. मात्र बीएसएनएलच्या सेवेत सातत्याने बिघाड निर्माण होत असतो. यामुळे वारंवार इंटरनेट सेवा प्रभावित होते. याचाच परिणाम शासकीय कार्यालयातील लिंक सदैव फेल राहत असल्याने विविध कामाकरिता येणाºया नागरिकांना त्रास सहन करावा लागतो.

टॅग्स :BSNLबीएसएनएल