वर्धा : गिरोली सर्कल येथील बीएसएनएल ब्रॉडबॅन्ड सेवा मागील १५ दिवसापासून ठप्प आहे. गिरोली येथे बीएसएनएलची ब्रॉडबॅन्ड सेवा पुरविण्यात येत आहे. परंतु मागील १५ दिवसांपासून ही ब्रॉडबॅन्ड सेवा ठप्प असून याचा फटका ग्राहकांना बसत आहे. सोबत पंधरा दिवसाच्या ब्रॉडबॅन्डच्या बिलाचा भूर्दंडही ग्राहकांना सहन करावा लागत आहे.गिरोली येथे बीएसएनएल चे टॉवर असून या टॉवरवरील बॅटरीयंत्र काम करीत नाही. विद्युतपुरवठा बंद झाल्यास बीएसएनएलची संपूर्ण सेवा बंद पडते. विद्युत पुरवठा सुरू झाल्यानंतर २० ते ३० मिनिटांनी लँडलाईन सेवा सुरू होते. वारंवार तक्रात करूनही ग्राहकांच्या समस्यांकडे लक्ष दिले जात नाही. दोन दिवसात चालू होईल, तीन दिवसात चालू होईल असे सांगून आज पंधरा दिवस होऊनही सेवा ठप्प असल्याने येथील ग्रामपंचायत, प्रा.आ.केंद्र, म.रा.वि.म. व इतर ग्राहकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.(शहर प्रतिनिधी)
बीएसएनएल ब्रॉडबॅन्ड सेवा ठप्प
By admin | Updated: February 18, 2015 01:56 IST