शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

शिवरायांचा अवमानप्रकरणी बीआरएसपीचा जनआक्रोश मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 21:56 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा भंगला असल्याचे दाखवत भंगारात टाकला आणि या पुतळ्याची किंमत ४० ...

ठळक मुद्देदोषींवर कारवाईची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा भंगला असल्याचे दाखवत भंगारात टाकला आणि या पुतळ्याची किंमत ४० रुपये दर्शविण्यात आली. शिवरायांच्या अवमानप्रकरणी दोषी व्यक्तींवर कठोर दंडात्मक कारवाई करण्यासह अन्य मागण्यांकरिता बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीने जनआक्रोश मोर्चाद्वारे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यापासून निघालेला मोर्चा प्रमुख मार्गावरून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोहोचला. यावेळी मोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर झाले. बीआरएसपीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुरेश माने, उमेश म्हैसकर यांच्यासह अनेकांनी मोर्चाला संबोधित केले. मोर्चातील शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले.छत्रपती शिवरायांच्या अवमाननेची घटना हिंगणघाट पंचायत समितीत घडली. याचे सर्वत्र संतप्त पडसाद उमटले. मराठा समाज आणि शिवप्रेमी संघटनांनी आंदोलने केली. हिंगणघाट येथील ठाणेदारांनी मध्यस्थी करीत गटविकास अधिकारी आणि आंदोलनकर्ते यांच्यात चर्चा घडवून आणली.यावेळी गटविकास अधिकाºयांनी घडलेल्या प्रकाराविषयी माफी मागून दोषींवर कारवाईच्या अनुषंगाने कळविण्याचे जाहीर केले. गटविकास अधिकाऱ्यांनी पाच दोषी कर्मचाºयांची नावे पाठविली. मात्र अद्याप दोषींवर कारवाई करण्यात आली नाही, वर्षभरापासून रखडलेली विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती त्वरित देण्यात यावी, आदिवासींना घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा, नझुलवर अतिक्रमित दुकानदारांना कायमस्वरूपी जागेचे पट्टे देण्यात यावे आदी मागण्या जिल्हाधिकाºयांना सादर करण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आल्या.मोर्चात बीआरएसपीचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष दशरथ मडावी, प्रा. ज्ञानेश वाकुडकर, रमेश पाटील जी. एम. खान, चंद्रमणी वानखडे, नीलेश कांबळे, संजय वानखडे, राजू धोटे, विजय थोरावत, प्रमोद सार्जन यांच्यासह शेकडो नागरिकांचा सहभाग होता. उल्लेखनीय बाब म्हणजे या मोर्चासाठी शिवाजी चौकात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवला होता मोर्चा चारचाकी वाहनातून गेला.