शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

फोडलेले रस्ते उठले वर्धेकरांच्या जिवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 05:00 IST

मागील तीन वर्षांपासून शहरात नगरपालिकेच्या वतीने भूमिगत गटार योजना, अमृत या वाढीव पाणीपुरवठा योजनेचे काम नियोजनाच्या अभावात आणि कंत्राटदाराच्या मर्जीने  सुरू आहे. याकरिता रस्त्यांचे फोेडकाम जोरात सुरूच आहे. २२५ कोटींच्या योजनेकरिता ५०० कोटींच्या रस्त्यांची चाळण करण्यात आली आहे. योजनेकरिता नव्यानेच बांधलेले रस्ते फोडण्यात आले. योजनेकरिता एकवेळा रस्ता खोदल्यानंतर पुन्हा त्याच रस्त्यावर खोदकाम करण्याचा अजब - गजब प्रकार सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सध्या सणासुदीचे दिवस आहेत. अशातच शहरातील मुख्य मार्गावर आणि इतर सर्व रस्त्यांचे फोडकाम अव्याहतपणे सुरूच आहे. या रस्त्यांवरून जीव मुठीत घेऊनच मार्गक्रमण करावे लागत असल्याने  वर्धेकरांमध्ये संतापाची लाट आहे. या संतापाचे पडसाद नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत उमटतील, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत.मागील तीन वर्षांपासून शहरात नगरपालिकेच्या वतीने भूमिगत गटार योजना, अमृत या वाढीव पाणीपुरवठा योजनेचे काम नियोजनाच्या अभावात आणि कंत्राटदाराच्या मर्जीने  सुरू आहे. याकरिता रस्त्यांचे फोेडकाम जोरात सुरूच आहे. २२५ कोटींच्या योजनेकरिता ५०० कोटींच्या रस्त्यांची चाळण करण्यात आली आहे. योजनेकरिता नव्यानेच बांधलेले रस्ते फोडण्यात आले. योजनेकरिता एकवेळा रस्ता खोदल्यानंतर पुन्हा त्याच रस्त्यावर खोदकाम करण्याचा अजब - गजब प्रकार सुरू आहे. फोडलेल्या रस्त्यांची नावापुरती डागडुजी करण्यात आली. मात्र, त्याचा दर्जा सुमार आहे. केवळ अर्थार्जनासाठी याकडे यंत्रणेने सोयीस्कर दुर्लक्ष केले असून, संपूर्ण शहरच खड्ड्यात घालत नागरिकांच्या जिवाशी खेळ मांडला आहे.    शहरातील एकाही वॉर्डांतील रस्ता वाहन चालविण्यायोग्य सोडा; पायी चालण्यायोग्यदेखील नाही. या पावसाळ्यात तर नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. अनेकांनी संबंधित नगरसेवकांविरुद्ध संतप्त भावना व्यक्त केल्या. नगरपालिकेतील सत्ताधारी पक्षाने शहराचे वाटोळे केल्याने आगामी होणाऱ्या निवडणुकीत  विद्यमान पदाधिकाऱ्यांना खड्ड्यात घालण्याची भाषा नागरिक करताना दिसत आहेत. 

योजनेने घेतला बालकाचा बळी- योजनेकरिता केलेल्या खड्ड्यात पडल्याने एका निष्पाप बालकाला जीव गमवावा लागला. कित्येकांना अपघातात अपंगत्व आले. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला. नागरिकांकडूनही शेकडो तक्रारी झाल्या. मात्र, काहीही झाले नाही. कमिशनच्या हव्यासात जाणिवा बोथट झालेल्या कंत्राटदार आणि पालिकेतील यंत्रणेने हा विषय ‘पद्धतशीर’ हाताळला.के पैसा बोलता है...- भूमिगत गटार योजनेला प्रारंभापासूनच प्रचंड विरोध झाला. मात्र, पालिकेतील उच्चपदस्थ पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी विरोधाला न जुमानता योजना राबविण्याचा अट्टाहास कायम ठेवला. या फसव्या योजनेने सर्वांनाच ‘लक्ष्मीदर्शन’ घडविले. त्यामुळेच के पैसा बोलता है... याचा प्रत्यय येत आहे.

प्रधान सचिवांच्या आदेशाला केराची टोपली- भूमिगत गटार योजनेकरिता शहरातील विविध भागातील रस्ते फोडण्यात आले. या रस्त्यांची थातूरमातूर डागडुजी संबंधित कंत्राटदाराकडून करण्यात आली. नागरिकांना पावसाळ्यात खडतर रस्त्यांचा सामना करावा लागू नये, यासाठी पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करण्याचे आदेश नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांनी दिले होते. मात्र, या आदेशालाही पालिकेने केराची टोपली दाखविली.  

 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा