शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांनी उघडे पाडले निकृष्ट कामाचे पितळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 22:47 IST

सावंगी (मेघे) ते बोरगाव (मेघे) बायपास रस्त्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला; पण रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले.

ठळक मुद्देनिकृष्ट कामांना विरोध केल्याने आरोप : पत्रपरिषदेत आमदारांची स्पष्टोक्ती

आॅनलाईन लोकमतवर्धा : सावंगी (मेघे) ते बोरगाव (मेघे) बायपास रस्त्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला; पण रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले. सिमेंटऐवजी गिट्टीचाच रस्ता करण्यात आला. याबाबत वरिष्ठांकडे तक्रार करण्यात आली असून गुणनियंत्रक पथकानेही पाहणी केली. आ.डॉ. पंकज भोयर यांनी सोमवारी सावंगी ते बोरगाव रस्ता गाठून जनतेसमोर त्याच्या दर्जाचे पितळ उघडे पाडले.सावंगी ते बोरगाव या बायपास मार्गाकरिता एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. दोन-तीन महिन्यांपूर्वीच सदर रस्त्याचे काम पूर्ण झाले. या सिमेंट रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे. रस्त्याचे पितळ उघडे पडू नये म्हणून सिमेंट रस्त्यावर चुरी टाकण्यात आली आहे. चुरी टाकलेला हा एकमेव सिमेंट रस्ता ठरला आहे. यामुळे आ.डॉ. भोयर व पदाधिकाºयांनी सदर रस्त्यावर पाणी मारून चुरी बाजूला केली. गिट्टी अंथरून त्यावर सिमेंटचे पाणी मारल्याचे रस्त्याची स्थिती पाहिल्यास स्पष्ट होत होते.तत्पूर्वी आ.डॉ. भोयर यांनी विश्रामगृहात पत्रपरिषद घेतली. यात निकृष्ट कामांना विरोध केल्यामुळे आपण पैसे मागण्याचा आरोप संबधीत कंत्राटदाराने केला. काही दिवसांपूर्वी शहरातील मोठ्या कामांची पाहणी केली. यात निकृष्ट दर्जाच्या कामांबाबत वरिष्ठांकडे तथा बांधकाम विभाग व जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार केल्याने कामांची चौकशी झाली. कामाचा दर्जा नसल्याने कार्यवाही झाली. यामुळे काही कंत्राटदार दुखावले गेले असावेत, असे ते म्हणाले. मी कुठलेही बिल कुणालाही दिले नाही. यामुळे कंत्राटदार व अधिकाºयांनी केलेले आरोप चुकीचे आहेत. २५ कोटींच्या बॅचलर रोडची वरिष्ठांकडे तक्रार केली. यावर संबंधित कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई झाली आहे. प्रत्येक कामांना भेटी दिल्या. यात निकृष्ट कामांबाबत तक्रारी केल्यात. कामे चांगली व्हावीत, हाच या मागचा उद्देश होता. लोकप्रतिनिधी तथा अधिकाऱ्यांच्या सूचनांनाही कंत्राटदार दाद देत नसल्याने तक्रारी कराव्या लागल्याचेही आ.डॉ. भोयर यांनी सांगितले. यामुळे सर्व संबंधित कार्यान्वय यंत्रणेकडून प्रत्येक महिन्याच्या शेवटल्या आठवड्यात कामनिहाय प्रगती अहवाल मागवावा. प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला कार्यप्रगती अहवाल लोकप्रतिनिधी, जनता व माध्यमांसमोर सादर करण्याच्या सूचना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्याचेही त्यांनी सांगितले.व्हीएनआयटीची मागणीशहरात अमृत योजनेंतर्गत १०० कोटी रुपयांची कामे केली जात आहेत. ही कामे योग्य पद्धतीने होताना दिूसन येत नाही. रस्ते खोदले जातात; पण ते व्यवस्थित बुजविले जात नाही. अनेक ठिकाणचे पेव्हमेंट काढून खोदकाम केले; पण ते पुन्हा लावले नाही. वास्तविक, ही संबंधित कंत्राटदाराची जबाबदारी आहे. यामुळे हा प्रकार थांबविण्यासाठी अमृत योजनेतील कामांवर देखरेख ठेवण्यासाठी तथा कामे गुणवत्तापूर्ण व्हावी म्हणून व्हीएनआयटी नागपूर या संस्थेची नियुक्ती करावी, अशी मागणी आ.डॉ. पंकज भोयर यांनी केली. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रही दिले आहे.गुणनियंत्रकांच्या पाहणीत आढळले दोषआ.डॉ. भोयर यांनी केलेल्या तक्रारीवरून गुणनियंत्रक पथकाने सावंगी ते बोरगाव रस्त्याची पाहणी केली. यात ० ते १५० मीटरपर्यंत रस्त्यावर सिमेंटचे पाणी टाकल्याचे व निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचे नमूद केले. शिवाय १५० ते ४९१ मीटरपर्यंतच्या रस्त्यावर भेगा गेल्याचे दिसून आले. ० ते २५० मीटरपर्यंतच्या साईडपट्ट्या मुरूमने तर उर्वरित रस्त्याच्या दोन्ही बाजूला माती टाकल्याचे दिसून आले, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. यात सुधारणा करून फोटोसह माहिती सादर करण्याच्या सूचनाही संबंधित कंत्राटदार व अधिकाºयांना देण्यात आल्यात.