शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

सत्य आचरणात आणून गांधींनी अहिंसेलाच शस्त्र बनविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2021 05:00 IST

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी आपल्या जीवनात सत्य आणि अहिंसेचे महत्त्व ओळखून सत्य आचरणात आणले. ज्या इंग्रज सत्तेचा सूर्यास्त होत नव्हता, अशांसोबत महात्मा गांधी यांनी अहिंसेला शस्त्र बनवून लढा दिला, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.  महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्व विद्यालयात ‘गांधी का दर्शन : वैश्विक साम्प्रदायिकता का समाधान’ या विषयावर आयोजित संगोष्ठित ते बोलत होते.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सत्य आचरणात आणणे सहज सोपे नाहीच; पण काहींनी ते आपल्या आचरणात आणल्याचे वास्तव आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी आपल्या जीवनात सत्य आणि अहिंसेचे महत्त्व ओळखून सत्य आचरणात आणले. ज्या इंग्रज सत्तेचा सूर्यास्त होत नव्हता, अशांसोबत महात्मा गांधी यांनी अहिंसेला शस्त्र बनवून लढा दिला, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्व विद्यालयात ‘गांधी का दर्शन : वैश्विक साम्प्रदायिकता का समाधान’ या विषयावर आयोजित संगोष्ठित ते बोलत होते. व्यासपीठावर महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्व विद्यालयाचे कुलपती प्रो. रजनीशकुमार शुक्ल, कुलसचिव कादर नवाज खान, नितीश भारद्वाज, कालिदास संस्कृत विश्व विद्यालयाचे कुलपती श्रीनिवास वरखेडी यांची उपस्थिती होती. राज्यपाल पुढे म्हणाले, मानवी जीवनाचा प्रत्येक विषय गांधींच्या विचाराने प्रभावित होतो. गांधी विचारांमध्ये गीता, बुद्ध, नानक, रामदास यांचे दर्शन होते. आत्मकथेत अनेक व्यक्ती आपल्या कमजोरी लपवितात; पण बापूंनी आपल्या कमजोरी लपविलेल्या नाहीत. संस्कार आणि भाषेला गांधींनी महत्त्व देत देशाला एकत्र आणण्यासाठी हिंदी भाषेचा वापर केला. गांधींकडे दूरदृष्टी होती. त्यांचे विचार आत्मसात करून देशालाच नव्हे, तर जगालाही प्रगती साधता येत असल्याचे यावेळी राज्यपाल कोश्यारी यांनी स्पष्ट केले.नितेश भारद्वाज यांनी सध्या व्यवसायप्रधान शिक्षण दिले जात आहे; पण आज आत्मविश्वासी मानव निर्मितीच्या शिक्षणाची गरज असल्याचे सांगितले. अमृतमहोत्सवी वर्षात आपण दिशा निश्चित केल्यास पुढील २५ वर्षांमध्ये भारताचा आणखी विकास होईल. शिवाय भारत विश्वगुरू होईल, असेही स्पष्ट केले. महर्षी, देवर्षी व राजर्षी, असे तीन द्रष्टे आहेत; पण महात्मा गांधी यांनी महात्मा हा नवा द्रष्टा रचला. सत्याची अनेक मुखे असून, महात्मा गांधी हे सत्याचे उपासक होते, असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्व विद्यालयाचे कुलपती रजनीशकुमार शुक्ल यांनी केले, तर उपस्थितांचे आभार कुलसचिव कादर नवाज खान यांनी मानले. 

गांधी हिल्सवर राज्यपालांनी केले दीप प्रज्वलित - महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्व विद्यालय परिसरातील गांधी हिल्स येथे दीप प्रज्वलित करून दीपोत्सवाचा शुभारंभ केला. यावेळी हिंदी विश्व विद्यापीठातील अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

 

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारी