शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
2
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
3
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
5
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
6
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
7
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
9
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
10
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
11
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
12
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
13
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
14
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
15
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
16
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
17
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
18
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
19
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
20
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 

पुलाअभावी नदीपात्रच बनले मार्ग

By admin | Updated: January 12, 2017 00:26 IST

प्रत्येक गावात रस्ता आणि पूल देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. यावर कोट्यावधी रुपयांचे बजेट आहे.

चार गावांची व्यथा : विद्यार्थी पावसाळ्यात पोहून करतात रस्ता पार गौरव देशमुख  वर्धा प्रत्येक गावात रस्ता आणि पूल देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. यावर कोट्यावधी रुपयांचे बजेट आहे. असे असताना हिंगणघाट व समुद्रपूर विधानसभा क्षेत्राच्या सीमेवर असलेली साकुर्ली, धानोली, जेजुरी, नांद्रा या गावांना दोन्ही तालुक्याशी जोडणाऱ्या पुलाची प्रतीक्षा आहे. या गावातील नागरिकांना तालुक्याच्या स्थळी जाण्याकरिता जीवावर उदार होवून या नदीतूनच रस्ता काढावा लागत आहे. यामध्ये सर्वाधिक हेळसांड बाहेरगावी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची होत आहे. ही समस्या केव्हा मार्गी लागेल, असा प्रश्न या चार गावातील नागरिकांना पडला आहे. साकुर्ली-धानोली गावाच्या शेजारी धामनदी आहे. तर धानोली, नांद्रा, जेजुरी या गावाच्या शेजारी बोरनदी आहे. या गावातील नागरिकांनी स्वखर्चाने अनेक वेळा बांध तयार केला. या बांधावरून गावकरी ये-जा करायचे; परंतु नदीला पूर येताच तो वाहून जातो. यामुळे नाईलाजास्तव ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांना पुराच्या पाण्यातून पोहत शेती व शाळेला रस्ता धरावा लागत आहे. सन २००६ मध्ये आलेल्या पुरामुळे धानोली व नांद्रा या दोन्ही गावांना धामनदी व बोरनदीच्या पाण्याने वेढा बसला होता. त्यावेळी या गावातील ग्रामस्थांना वाचविण्यात प्रशासनाला यश आले होते. रस्ता व पुलाकरिता चार गावांतील नागरिकांचा टाहो साकुर्ली-धानोली या मधोमध धामनदी आहे. धानोली-जेजुरी या मधोमध बोरनदी आहे. धानोलीच्या पूर्वेस व नांद्रा या गावाच्या पश्चिमेस बोरनदी आहे. या गावात रस्ते नाही. नदीवर पूल नाही. या गावात रस्ते देऊन नदी पात्रात पूल बांधण्यात यावा, अशी गावकऱ्यांची मागणी आहे. त्यामुळे साकुर्ली, धानोली, जेजुरी, नांद्रा, आष्टा, बावापूर, सांवगी, देरडा, या गावाना मोठ्या प्रमाणात फायदा होईल. याबाबत ग्रामस्थांनी अनेक वेळा प्रशासन व लोकप्रतिनिधीकडे मागणी केली; परंतु आश्वासनाशिवाय त्यांना काहीच मिळाले नाही. त्यामुळे या पूल व रस्त्याकरिता या गावातील नागरिकांचा टाहो कायम आहे. धानोली, साकुर्ली, जेजुरी, नांद्रा या गावाच्या लगत धामनदी व बोरनदी आहे. मात्र रस्ता व नदीवर पुल नसल्याने ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांना नदीच्या पात्रातून जीवघेणा प्रवास करावा लागतो. तसेच शेतकऱ्यांना बी-बियाणे, खत व शेत साहित्य शेतात नेते वेळी नदीच्या पात्रातून जीवघेना प्रवास करावा लागतो. या बाबत प्रशासन व लोकप्रतिनिधीला वारंवार मागणी केली. मात्र आश्वासनाच्या पलिकडे काहीही मिळालेले नाही. या नदी पात्रावर पूल झाल्यास सात गावांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल. - स्वप्नील देशमुख, अध्यक्ष, भूमिपुत्र संघर्ष वाहिनी संघटना, वर्धा