शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

देवळी तालुक्यात रातोरात बदलले वाळूसाठ्याचे ब्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 23:15 IST

देवळी येथील तहसील कार्यालयाच्यावतीने करण्यात आलेल्या वाळूच्या लिलावात गैरप्रकार झाल्याचा आरोप एका प्रत्यक्षदर्शींनी जिल्हाधिकाºयांना सादर केलेल्या निवेदनातून केला आहे.

ठळक मुद्देलिलावावर आर्थिक व्यवहाराचे सावट : प्रत्यक्षदर्शींची जिल्हाधिकाºयांना तक्रार

आॅनलाईन लोकमतवर्धा : देवळी येथील तहसील कार्यालयाच्यावतीने करण्यात आलेल्या वाळूच्या लिलावात गैरप्रकार झाल्याचा आरोप एका प्रत्यक्षदर्शींनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनातून केला आहे. लिलावाची प्रक्रिया पार पाडताना रातोरात वाळू साठ्याची ब्रास बदलण्यात आल्याने लिलावावर आर्थिक व्यवहाराचे सावट असल्याचेही तक्रारीत नमुद आहे. यामुळे सदर तक्रारीची जिल्हाधिकाºयांनी दखल घ्यावी अशी मागणी होत आहे.अवैध वाळू साठवणुकीचे लिलाव देवळी तहसील कार्यालयाच्यावतीने २७ आॅक्टोबरला करण्यात आले. ज्या दिवशी लिलाव झाले त्या दिवशी दोनच जागेचा लिलाव झाला. परंतु, तहसील कार्यालयाच्यावतीने तीन लिलाव झाल्याचे दर्शविण्यात आले आहे. लिलावाच्या दिवशी एकलासपूर येथील शेत सर्वे क्र. ४ मधील ३५२.०६ वाळूसाठ्याचा लिलाव करण्यात आला. येथे १ हजार ते १ हजार ५०० ब्रास रेतीसाठा आहे. निमगव्हाण येथील शेत सर्वे क्रमांक न टाकता नदी घाट या नावाने ८७.०२ ब्रास वाळूचा लिलाव करण्यात आला. निमगव्हाण येथे वाळूसाठा असला तरी तेथील मुदत संपली असतानाही हा लिलाव सव्हे क्रमांक न टाकता करण्यात आला. यामुळे सदर प्रकार आर्थिक व्यवहाराची साक्ष देणारा असल्याची ओरड आहे. यामुळे झालेल्या लिलाव प्रक्रियेत गैरप्रकार झाला असून त्याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकाºयांना निवेदनातून केली आहे.न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना लिलावआॅगस्ट महिन्यात निमगव्हाण येथील घाट मालकाविरुद्ध अमरावती जिल्ह्यातील चांदूर (रे.) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातच हा वाळूसाठा जप्त करण्यात आला आहे. न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना या वाळूच्या लिलावाचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.ब्रास कमी करीत गुंजखेडाच्या वाळूचा लिलावगुंजखेडा येथील शेत सर्वे क्रं. ३९७/२ मधील जाहीरनाम्यानुसार ६५३.९७ ब्रास वाळूसाठा हा कमी करीत ४०२ ब्रास वाळूसाठ्याचा लिलाव करण्यात आला. शिवाय लिलावाच्या दिवशी कुठलीही अनामत रक्कम न भरता तसेच कोणतीही बोली न बोलता लिलाव करण्यात आला. विचारणा केली असता उडवा-उडवीचे उत्तरे दिल्या जात असल्याचे तक्रारकर्त्यांचे म्हणणे आहे.जिल्हाधिकाऱ्यांची दिशाभूलसदर लिलाव प्रक्रियेतील गौडबंगाल झाकण्याकरिता लिलावानंतर जिल्हाधिकाºयांना सादर करण्यात येणारे कार्यवृत्त तब्बल देवळी तहसील कार्यालयाच्यावतीने सहा ते सात वेळा बदलविले. शिवाय जिल्हाधिकाºयांना सादर केलेल्या कार्यवृत्तात वास्तविकला लपविल्याचा आरोप आहे.नाव नोकराचे, काम मालकाचेवाळूसाठ्याच्या लिलाव प्रक्रियेत ज्यांच्या नावे लिलाव घेतल्याचा आदेश पारीत झाला ते या लिलावालाही उपस्थित नसल्याची माहिती आहे. ज्यांच्या नावाने आदेश पारीत होणार आहे ते इतर ठेकेदारांचे नोकर असल्याची चर्चा जोरात आहे.तहसील कार्यालयाद्वारे झालेली वाळू लिलावाची प्रक्रिया नियमानुसार झाली आहे. शिवाय जिल्हाधिकाºयांना सादर केलेले कार्यवृत्त व्यवस्थीत आहे. कुणालाही आक्षेप असल्यास त्याने न्यायालयात यावे.- तेजस्वीनी जाधव, तहसीलदार, देवळी.