शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
3
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
4
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
5
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
6
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
7
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
8
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
9
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
10
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
11
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
12
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
13
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
14
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
15
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
16
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
17
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
18
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
19
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
20
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार

पार्सल सेवेला उत्पन्नाचा ‘ब्रेक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 23:42 IST

थील रेल्वे स्थानकात रेल्वे विभागाच्यावतीने कार्यरत असलेली पार्सल सेवा मागील पाच वर्षांपूर्वी कमी उत्पन्न मिळत असल्याचे कारण काढून बंद करण्यात आली. या संदर्भात अद्याप कुठलाही निर्णय झाला नसल्याने नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देवर्धा रेल्वे स्थानकातील प्रकार : वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : येथील रेल्वे स्थानकात रेल्वे विभागाच्यावतीने कार्यरत असलेली पार्सल सेवा मागील पाच वर्षांपूर्वी कमी उत्पन्न मिळत असल्याचे कारण काढून बंद करण्यात आली. या संदर्भात अद्याप कुठलाही निर्णय झाला नसल्याने नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे रेल्वे विभागाने याकडे लक्ष देत ती सेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.रेल्वे जाळ्यानुसार विचार केल्यास वर्धा येथील सेवाग्राम रेल्वे स्थानकावरून देशाच्या चारही बाजूला रेल्वे जाणे शक्य आहे. तसे होतही आहे. जिल्ह्याचा विचार केल्यास सुमारे २५० कि़मी.चे लोहमार्गचे जाळे आहे. हे लोहमार्गचे जाळे जिल्ह्यातील प्रवाशांसह जिल्ह्याबाहेरील नागरिकांसाठी फायद्याचेच आहे. महात्मा गांधी व आचार्य विनोबा भावे यांची कर्मभूमी राहिलेल्या वर्धा येथे देश-विदेशातील पर्यटक गांधी-विनोबांच्या कार्याची माहिती त्यांचे विचार आत्मसात करण्याकरिता येतात; परंतु, वर्धा जंगशनवर रेल्वे विभागाकडून पार्सल सुविधाच नसल्याने अनेकांचा हिरमोड होत असल्याचे दिसून आले. पार्सल सेवा बंद असली तरी लगेज सेवा सुरू असल्याचे रेल्वे विभागाच्या स्थानिक अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. पार्सल सेवेचा लाभ घेताना साहित्यासोबत सदर व्यक्तीला जाणे क्रमप्राप्त नसते. मात्र, लगेज सेवेचा लाभ घेताना साहित्यासोबत व्यक्तीला जाणे अनिवार्य असल्याचेही अधिकाºयांनी सांगितले. बंद करण्यात आलेल्या वर्धा रेल्वे स्थानकावरील पार्सल सेवा नागरिकांसाठी तात्काळ सुरू करण्यात यावी, अशी मागणी आहे.पार्सलचे कर्मचारी इतर कामात व्यस्तज्या कालावधीत वर्धा रेल्वे स्थानकावर रेल्वे विभागाची पार्सल सेवा सुरू होती. त्यावेळी या विभागात अनेक कर्मचारी कार्यरत होते. ही सेवा बंद झाल्याने या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी न करता रेल्वेच्या इतर विभागात सुरू असलेल्या कामाकरिता वळते केल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.दोन मिनिटांचा थांबा ठरतोय अडचणीचावर्धा रेल्वे स्थानकावरून दररोज शेकडो रेल्वे गाड्या ये-जा करीत असल्या तरी बहूतांश रेल्वे गाड्यांचा थांबा हा दोन मिनिटांचाच आहे. नागरिकांचे पार्सल रेल्वे गाडीत चढविणे व उतरविणे यासाठी किमान पाच मिनिटांचा थांबा आवश्यक असल्याचे रेल्वेच्या कर्मचाºयांनी सांगितले. वर्धा रेल्वे स्थानकात पार्सल सेवा पूर्ववत सुरू व्हावी, यासाठी लोकप्रतिनिधींनीही प्रयत्न करावे, वर्धेकरांची अपेक्षा आहे.रेल्वे विभागाची पार्सल सेवा सुमारे पाच वर्षांपूर्वी वर्धा रेल्वे स्थानकावर सुरू होती. आता लगेज सुविधा नागरिकांना देण्यात येत आहे. रेल्वे विभागाला यातून मिळणारे उत्पन्न कमी असल्याने ही पार्सल सेवा बंद करण्यात आली असावी.- एस. के. झा, उप स्टेशन प्रबंधक, वर्धा रेल्वे स्थानक.