शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
2
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
3
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
4
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
5
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
6
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!
7
IPS Archit Chandak : देशसेवेचं स्वप्न! तब्बल ३५ लाखांचं पॅकेज नाकारलं अन् पहिल्याच प्रयत्नात IPS, पत्नीही आहे IAS
8
iPhone 17 Series:'फोल्ड करून दाखवा', आयफोन १७ सिरीज लाँच होताच सॅमसंगने अ‍ॅपलची खिल्ली उडवली
9
"घाई काय आहे, अजिबात नाही"; भारत-पाक सामन्यावर सुप्रीम कोर्टाने दिला तीन वाक्यात निकाल
10
एफडी विसरा... पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५.५५ लाख रुपयांचा फिक्स परतावा; दरमहा मिळेल व्याज
11
Navya Malik : आधी मैत्री, मग ग्राहक बनवायची; नेत्यांच्या मुलांना केलं वेडं, ड्रग्ज क्वीनने ८५० श्रीमंतांना लावलं व्यसन
12
मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार; तारीख ठरली
13
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या
14
अवघ्या १५ दिवसांच्या बाळाला फ्रीजमध्ये ठेवून झोपली आई; कारण समजताच कुटुंबीय हादरले!
15
संतोष देशमुख हत्या खटल्याची सुनावणी लांबविण्याचा प्रयत्न; विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा न्यायालयात आरोप
16
भारतातून पळालेल्या झाकीर नाईकला झाला एड्स? आता मलेशियामधून समोर आली अशी माहिती
17
IND vs UAE: अभिषेक शर्माची रेकॉर्ड बूकमध्ये नोंद, 'अशी' कामगिरी करणारा चौथा भारतीय
18
हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू
19
मंगळावर खरंच जीवसृष्टी होती? NASA रोव्हरने शोधून काढली अशी गोष्ट, तुम्हीही व्हाल अवाक्
20
दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?

पवनारातील ‘ब्रह्म विद्या मंदिर’ स्त्री सक्षमीकरणाचे विद्यापीठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 05:00 IST

महाराष्ट्रातील रत्नागिरीतील गागोदे या लहानशा खेड्यात ११ सप्टेंंबर १८९५ ला जन्मलेल्या विनायक नरहरी भावे यांचे कार्य विश्वव्यापी राहिले आहे. त्यांनी १९१६ मध्ये आपले ध्येय साध्य करण्यासाठी गृहत्याग केला. काशीत ज्ञानार्जन करीत असताना गांधीजींचे भाषण ऐकले. इंग्रजा विषयी बापूंच्या विचार व मतांवर विनोबा प्रभावित होऊन दोघांमध्ये पत्रव्यवहार सुरू झाला. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यासोबत भेट झाल्यानंतर सेवाग्राम आश्रम त्यांच्यासाठी मातृस्थान बणले.

ठळक मुद्देदिनविशेष : भूदान चळवळीचे प्रणेते आचार्य विनोबा भावे यांची आज १२५ वी जयंती

लोकमत न्यूज नेटवर्कपवनार/सेवाग्राम : भूदान चळवळीचे प्रणेते, स्वातंत्र लढ्यातील पहिले सत्याग्रही तसेच महान विचारांचे क्रांतीदूत आचार्य विनोबा भावे यांनी ‘जय जगत’ चा नारा देत पवनार गाठले. येथील धामनदीच्या तीरावर परमधाम आश्रमाची निर्मिती करुन ‘ब्रम्ह विद्या मंदिर’ स्थापन केले. या मंदिरातून स्त्री सक्षमीकरणाकरिता पाऊले उचलण्यात आली असून त्यांच्या उद्धारासाठी प्रयत्न केले. आजही त्यांचे हे कार्य अविरत सुरु असल्याने हे मंदिर महिला सक्षमीकरणाचे विद्यापीठच ठरले आहे.महाराष्ट्रातील रत्नागिरीतील गागोदे या लहानशा खेड्यात ११ सप्टेंंबर १८९५ ला जन्मलेल्या विनायक नरहरी भावे यांचे कार्य विश्वव्यापी राहिले आहे. त्यांनी १९१६ मध्ये आपले ध्येय साध्य करण्यासाठी गृहत्याग केला. काशीत ज्ञानार्जन करीत असताना गांधीजींचे भाषण ऐकले. इंग्रजा विषयी बापूंच्या विचार व मतांवर विनोबा प्रभावित होऊन दोघांमध्ये पत्रव्यवहार सुरू झाला. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यासोबत भेट झाल्यानंतर सेवाग्राम आश्रम त्यांच्यासाठी मातृस्थान बणले. बापूंनीच त्यांचे नाव विनोबा असे ठेवून १९२१ मध्ये आश्रमातील संचालनाची जबाबदारी सोपविली.तेव्हापासून विनोबांनी शिक्षण, ग्रामोद्योग, कुष्ठसेवा, चर्मोद्योग, भंगीकाम, सूतकताई, बुनाई, अध्ययनासह रचनात्मक कार्यात अनेक प्रयोग केले. त्यांची साहित्य निर्मितीही मोठी आहे. १९३०-१९३१ मध्ये गीताई गीताचा मराठीत अनुवाद करुन घराघरात गीताई पोहोचवली. १९३८ मध्ये ते पवनारला वास्तव्यास आले. याच ठिकाणी त्यांनी कांचनमुक्तीचा प्रयोग यशस्वी केला. महिलांसाठी १९५९ मध्ये ब्रम्हविद्या मंदिरची स्थापना केली.जगात स्त्रियांचे शोषण आणि उपेक्षितांचे जीवन कायम असल्याने त्यांच्या समस्येच्या निराकरणासाठी या मंदिरातून प्रयत्न सुरु केलेत. भूदान चळवळ विनोबांच्या जीवनातील महत्वपूर्ण ठरली. १९५१ मध्ये तेलंगणा मधील पोचमपल्ली गावात दलीतांसाठी कसायला जमिन मागितली असता एका व्यक्तीने शंभर एकर जमीन दानात दिली.याच घटनेने भूदान चळवळीचा पाया घातल्या गेला.६५ हजार किमीची पदयात्रा करुन ४२ लाख एकर जमीन मिळविली. या जमीनीचे भूमिहीनांना वाटप करून स्वालंबनाचा मार्ग दाखविला. अशा या महात्म्याची शुक्रवारी १२५ जयंती कोरोनायनामुळे साध्यापद्धतीने साजरी होणार आहे.आश्रमात सामूहिक निर्णयाला महत्त्वसध्या २५ स्त्रिया आणि २ पुरूष आश्रमात आहे. कुणीही प्रमुख नसून सर्व मिळून काम करतात. सामूहिक निर्णयाला महत्त्व दिल्या जाते. आश्रमात तीनतास शारीरिक व तीनतास मानसिक श्रम केल्या जाते. जीवन जगण्यासाठी जेवढ्या पैशाची गरज असते, तेवढे श्रम केले पाहिजे. सर्वांना समान मजूरी मिळाली पाहिजे. आश्रमात २५ मार्च हा स्थापना दिवस, विनोबांजींची जयंती मित्र मिलन आणि १५ नोव्हेंबर निर्वाण दिन आदी कार्यक्रम गावकऱ्यांकडून आयोजित केले जाते. आश्रमात दिवाळीला सप्ताहाचे आयोजन करुन शेवटच्या दिवशी काल्याचे कीर्तन होते. पण कोरोना प्रादुभार्वामुळे यावर्षी कार्यक्रमावर बंधने असल्याचे मत कांचन बहन यांनी व्यक्त केले.

टॅग्स :PavnarपवनारVinoba Bhaveविनोबा भावे