शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात बोंडअळीचे थैमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 23:43 IST

जिल्ह्यातील कपाशी उत्पादक शेतकऱ्यांची सध्या बोंडअळीच्या थैमानाने चिंता वाढविली आहे;पण जिल्ह्यातील कृषी विभाग बोंड अळीच्या प्रादुर्भावाला आटोक्यात आणण्यासाठी कुठलीही प्रभावी उपाययोजना करताना दिसत नाही.

ठळक मुद्देकृषी अधीक्षकांना साकडे : उपाययोजनेची प्रहारची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील कपाशी उत्पादक शेतकऱ्यांची सध्या बोंडअळीच्या थैमानाने चिंता वाढविली आहे;पण जिल्ह्यातील कृषी विभाग बोंड अळीच्या प्रादुर्भावाला आटोक्यात आणण्यासाठी कुठलीही प्रभावी उपाययोजना करताना दिसत नाही. कपाशी उत्पादक शेतकºयांना दिलासा देण्यासाठी कृषी विभागाने तात्काळ योग्य पावले उचलावी शिवाय नुकसानग्रस्त शेतकºयांना शासकीय मदत द्यावी, अशी मागणी प्रहारच्यावतीने जिल्हा कृषी अधीक्षक ज्ञानेश्वर भारती यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.जिल्ह्यातील कपाशी पिकावर मोठ्या प्रमाणात बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला असल्याचे दिसून येते. बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे अनेक शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसानही झाले आहे. यंदाच्या वर्षी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनातही मोठी घट येण्याची शक्यता शेतकºयांकडून वर्तविली जात आहे.पूर्वीच जिल्ह्यातील शेतकरी विविध संकटांमुळे हवालदिल झाला आहे. बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानीचे कृषी विभागासह महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ सर्वेक्षण करून नुकसानग्रस्त कपाशी उत्पादक शेतकऱ्यांना शासनाच्यावतीने आर्थिक मदत मिळून द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.निवेदन देताना प्रहारचे शहर प्रमुख विकास दांडगे, राजेंद्र लढी, अरविंद मसराम, आदित्य कोकडवार, किशोर हेमने, वैभव चतुरकर, सागर हिवरे यांच्यासह प्रहारचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.मागणीचा विचार न झाल्यास आंदोलनबोंडअळी हे सध्या जिल्ह्यातील कपाशी उत्पादकांवर ओढावलेले मोठे संकट आहे. त्यामुळे शेतकरीही मेटाकुटीस आला आहे. हवालदिल झालेल्या शेतकºयांना दिलासा देण्यासाठी तात्काळ उपाययोजना कराव्या शिवाय निवेदनातील मागण्यांवर येत्या दहा दिवसात सहानुभूतीपूर्वक विचार करावा अशी मागणी प्रहारने केली आहे. मागण्यांचा विचार न झाल्यास प्रहारच्यावतीने तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

टॅग्स :cottonकापूस