अनैतिक संबंधातून हत्या झाल्याचा संशयवर्धा : दारूच्या नशेत असलेल्या पिपरी येथील भोजराज इंगोले याची हत्या करून पुरवा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह एका पुलाखाली टाकण्यात आला होता. या हत्या प्रकरणाचा उलगडा झाला असून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. नारायण रामकृष्ण चरडे (३४) व गोविंद निकेश्वर दोन्ही रा. पिपरी अशी अटकेत असलेल्यांची नावे असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या दोघांनी हत्येचे कारण अद्याप सांगितले नसून या दोघांकडून अनैतिक संबंधाच्या कारणातून ही हत्या करण्यात आली असावी, असा संशय वडनेर पोलीस ठाण्याचे निरीक्षक यादव यांनी व्यक्त केला. अटकेत असलेल्या दोघांना २८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या दोघांच्या तोंडून खरे कारण येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. भोजराज याची हत्या रविवारी करण्यात आली असून यातील आरोपी अज्ञात होते.(प्रतिनिधी)
वडनेर येथील हत्या प्रकरणात दोघांना अटक
By admin | Updated: December 23, 2015 02:42 IST