शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

दोघांना पाच दिवसांचा पीसीआर

By admin | Updated: July 14, 2017 01:26 IST

उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्या बनावट डिजीटल सह्यांचा वापर करून जातीचे व नॉनक्रिमिलीयर सारखे

बनावट जात प्रमाणपत्राचे प्रकरण : आरोपीची संख्या वाढण्याची शक्यतालोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्या बनावट डिजीटल सह्यांचा वापर करून जातीचे व नॉनक्रिमिलीयर सारखे प्रमाणपत्र तयार करणाऱ्या असामाजिक तत्वांचे नुकतेच पितळ उघडे पाडण्यात आले. या प्रकरणातील आकाश मारोती खंडाते रा. देवळी व धर्मपाल कांबळे रा. कोल्हापूर सिंगारवाडी या दोन्ही आरोपीवर देवळी पोलिसांचे वतीने भादंवि ४२०, ४६८, ४७१, ४८४, ४६५, ४६६, १८६, १९७, ३४ तसेच माहिती व तंत्रज्ञान कायदा ७४, ६६ (क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. पोलीस कोठडीच्या पहिल्याच दिवशी गुरूवारचे सकाळी मुख्य आरोपी खंडाते यांची प्रकृती बिघडल्याने त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. या प्रकरणातील आरोपीची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.पोलीस सुत्रानुसार आरोपी खंडाते व कांबळे या दोघांचा देवळीत वेगवेगळ्या ठिकाणी जॉब सेंटर आहे. या माध्यमातून बनावट कागदपत्रे तयार करण्याचा गोरखधंदा सुरू होता. कागदपत्रांची आॅनलाईन प्रक्रिया सुरू झाल्यानंतर खंडाते याने तीन महिन्यापुर्वी निकिता वाघमारे यांचे दिघी (बोपापूर) चे नावाने नोंदणी असलेले सेतू केंद्र किरायाने घेतले. न.प. च्या बाजूला असलेल्या स्वत:च्या जॉब सेंटर मध्ये हे सेतू केंद्र थाटण्यात आले. या ठिकाणी सर्व बनावट सह्याचे दाखले मिळत होते. गरजूंना शेकडो दाखले देण्यात आले. कोणत्याही कागदपत्राशिवाय याठिकाणी जातीचे व नॉनक्रिमिलीयर सारखे प्रमाणपत्र मिळत असल्याने गरजुंनी दोन हजार रुपयांपर्यंत रक्कम मोजली. असेच एक बनावट प्रमाणपत्र तहसीलदार भागवत यांच्याकडे आले असता आरोपी खंडाते याचे नाव समोर आले. जिल्हाधिकारी यांना याबाबतची माहिती देण्यात आली. त्यानुसार तपासणी पथकाने खंडाते याचे जॉब सेंटरवर धाड टाकली. यात संगणकात दोन हजार प्रमाणपत्रे असल्याचे तसेच बहुतांश प्रमाणपत्र बारकोड खोटे असल्याचे आढळून आले.खंडाते यांचेवर या आधीही गुन्हे दाखल असल्याचे सांगितले जात आहे. एका राष्ट्रीय पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून खंडाते याने नुकतीच पार पडलेली पालिका निवडणूक लढविली असून पोलिसांचा तपास सुरू आहे.