घोराड येथे संत केजाजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाला प्रारंभघोराड : बोरतीर्थावर संत केजाजी महाराज यांच्या १०८ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त सुरू असलेल्या धार्मिक कार्यक्रमाने प्रतिपंढरी दुमदुमत आहे. १३ जानेवारीपासून या महोत्सवाला प्रारंभ झाला आहे. ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामूहिक पारायणाला ३०० हून अधिक भाविकांचा सहभाग आहे. पारायणाचे व्यासपीठ आळंदी येथील गोविंद महाराज यांच्याकडे असून श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताह सुरू आहे. एंरडोल येथील राजू महाराज पैठणकर भागवत कथेचे प्रवक्ता आहे. महोत्सवानिमित्त गोमाता मंदिरात गोमाता मूर्तीची स्थापना विठ्ठल महाराज भांदकर यांचे हस्ते करण्यात आली. भागवत ग्रंथ मिरवणुकीने वातावरण भक्तीमय झाले आहे. भाविकांचे येणे सुरू आहे.(वार्ताहर)
बोरतीर्थ परिसर दुमदुमला
By admin | Updated: January 14, 2015 23:13 IST