शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
3
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
4
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
5
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
6
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
7
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
8
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
9
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
10
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
11
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
12
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
13
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
14
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
15
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
16
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
17
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
18
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
19
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
20
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा

रामकृष्ण हरी...च्या जयघोषाने बोरतीर्थ दुमदुमले

By admin | Updated: February 10, 2016 02:32 IST

टाळ मृदुंगांचा निनाद, भगव्या पताका, डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन दिंडी पालखी सोहळा थाटात पार पडला.

फुलला भक्तांचा मळा : संत केजाजी महाराज पुण्यतिथी सोहळा; आज काल्याचे कीर्तनघोराड : टाळ मृदुंगांचा निनाद, भगव्या पताका, डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन दिंडी पालखी सोहळा थाटात पार पडला. वारकऱ्यांच्या गर्दीने व रामकृष्ण हरीच्या जयघोषाने अख्खे बोरतीर्थ दुमदुमून गेले होते. बोर नदीच्या तीरावर वसलेल्या व प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घोराड येथे संत केजाजी महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त मंगळवारी दिंडी पालखी सोहळा पार पडला. या दिंडीत २५० पेक्षा अधिक भजनी दिंड्या सहभागी झाल्या होत्या. संत केजाजी महाराजांनी रामकृष्ण हरी हा मंत्र दिला. डोळ्याचे पारणे फेडणारा हा सोहळा पाहण्यासाठी २० हजार पेक्षा जास्त भाविक घोराडमध्ये दाखल झाले होते. सकाळपासूनच घोराडकडे येणारे रस्ते भाविकांनी फुलून गेले होते. सकाळी ९ वाजता विठ्ठल रुख्माई मंदिरातून दिंडी पालखी सोहळ्याला प्रारंभ झाला. प्रत्येक भाविक या दिंडी सोहळ्यात सहभागी होत होता. बोरतीरावरून निघालेली दिंडीमध्ये हरिनामाचा गजर करीत पुढे जात असताना चंद्रभागेच्या तिरावर असल्याचा भास होत होता. दिंडी सोहळा हा आळंदी ते पंढरपूरची पायदळ वारीची आठवण करून देत असल्याचे भाविक सांगत होते. सायंकाळी ६ वाजेपर्यंत हा पालखी सोहळा सुरू होता. केजाजी महाराजांची पालखी फुलांच्या माळांनी सजविली होती. गावातील रस्ता न रस्ता रंगीबेरंगी रांगोळ्यांनी सजले होते. दोन किमीचा दिंंडी सोहळाघोराड : दिंडी चालत असताना फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव होत होता. विणेकऱ्यांचा पाय धवून, कुंकवाचा टिळा लावल्या जात होता. जागोजागी भाविकांचे स्वागत केले जात होते. भाविकांच्या सेवेसाठी घोराड मधील बालकापासून तर वयोवृध्दापर्यंत प्रत्येक नागरिक सेवेत व्यस्त होते. जवळपास दोन कि.मीच्या अंतरात हा दिंडी सोहळा असल्याने ग्रामस्थ व युवा मंडळाच्या मदतीने भाविकांची गैरसोय होवू नये म्हणून जागोजागी चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. विदर्भातून असंख्य भाविक हा सोहळा पाहण्यासाठी आल्याने जणू घोराडमध्ये भक्तांचा मळा फुलला होता. टाळ मृदुगांच्या ठेक्यावर, हरिनामाचा जप करीत १० तास हा दिंडी सोहळा भक्तीमय वातावरणात भक्तीचा रंग उधळत भाविकांना भक्तीरसाचे अमृतपान देत सायंकाळी ६ वाजता विठ्ठल रुख्मिणी मंदिर परिसरात पोहचली. ग्रामस्थाच्यावतीने दिंडी सोहळ्यानिमित्त आयोजित महाप्रसादाचा २० हजार भाविकांनी लाभ घेतला. या महाप्रसादाकरिता गावातूनच गोळा करण्यात येत असलेल्या लोकसहभागातील निधीचा वापर करण्यात येत आहे.(वार्ताहर)