शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
2
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
3
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
4
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
5
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
6
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
7
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
8
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
9
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
10
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
11
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
12
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
13
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
14
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
15
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
16
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
17
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
18
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
19
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
20
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य

बोरगावच्या गिट्टी खदानीत मजूर बुडाला

By admin | Updated: February 2, 2016 01:50 IST

बोरगाव (मेघे) परिसरात असलेल्या गिट्टी खदानीत मृतदेह बुडाल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली.

पोलीस ठाण्याच्या हद्दीच्या वादात घटना दुर्लक्षितवर्धा : बोरगाव (मेघे) परिसरात असलेल्या गिट्टी खदानीत मृतदेह बुडाल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. मात्र त्यांच्याकडून बुडालेल्या मजुराचा शोध घेण्यात कुचाराई होत असल्याने त्याचा पत्ता लागला नसल्याचा आरोप त्याच्या परिवारातील सदस्यांसह परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे. ही घटना शनिवारी घडली असून पोलिसांकडून सोमवारी खदानीतील पाणी काढण्याचे काम सुरू असून पोलिसांना काहीच गवसले नसल्याचे सांगण्यात आले. पाण्यात बुडालेल्या मजुराचे नाव आकाश मनोज मेश्राम असे असल्याचे सांगण्यात येत आहे. तो येथील केशव कळंबे यांच्याकडे मजुरीचे काम करीत असल्याचे सांगण्यात येत आहे. शनिवारी तो सकाळी नित्याप्रमाणे म्हशी घेवून चारण्याकरिता गेला होता. सायंकाळ झाली तरी त्याचा थांबपत्ता लागला नाही. यामुळे त्याचा शोध घेतला असता खदानीतील पाण्यात म्हशीचा मृतदेह आढळून आला. मात्र त्याचा पत्ता लागला नाही. यामुळे याच पाण्यात तो बुडाला असल्याचा अंदाज सर्वत्र वर्तविल्या जात आहे.या घटनेची माहिती सावंगी पोलिसांना देण्यात आली. त्यांनी सदर परिसर आपल्या हद्दीत येत नसल्याचे म्हणत सेवाग्राम पोलिसांकडे बोट दाखविले. सेवाग्राम पोलिसांनी हा परिसर आपल्या हद्दीत येत नसल्याचे सांगितले. यामुळे तपास रेंगाळल्याची ओरड परिसरात आहे. शनिवारी सावंगी पोलिसांनी घटनास्थळ गाठत गावातील नागरिकांना म्हशीचा मृतदेह काढण्यास सांगितल्याची माहिती ठाणेदार शेगावकर यांनी दिली. शिवाय पाण्यात शोध मोहीम राबविली तरी काहीच आढळून आले नाही. आता या तलावातील पाणी उपसण्याची भागातील नागरिकांची मागणी आहे. त्यामुळे पाणी काढण्यात येत आहे. वृत्त लिहिस्तोवर येथे काहीच आढळून आले नव्हते.(प्रतिनिधी) सेवाग्राम-सावंगी ठाण्याच्या हद्दीचा वादघटनास्थळ बोरगाव (मेघे) परिसरात येते. हा परिसर पहिले सेवाग्राम ठाण्यात होता. आता नव्याने सावंगी पोलीस ठाणे निर्माण करण्यात आले आहे. हा भाग त्यांच्या हद्दीत गेल्याची माहिती नागरिकांना देण्यात आली. घटनेची माहिती दिल्यानंतर सावंगी पोलिसांनी घटनास्थळ आपल्या हद्दीत येत नसल्याचे म्हणत सेवाग्राम पोलिसांकडे बोट दाखविले. सेवाग्राम पोलिसांनी पुन्हा सावंगी पोलिसांकडे बोट दाखविले. यात दोन दिवसांचा कालावधी गेला. ठाण्याच्या हद्दीच्या वादात मात्र घटनेकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष झाले.