शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

बोरखेडी व सुसूंदात वाघाची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 00:01 IST

न्यु बोर अभयारण्याला लागून असलेल्या गावात वाघाने दहशत निर्माण केली आहे. वाघाच्या या दहशतीमुळे सुसूंदचे नागरिक चांगलेच भयभीत झाले आहे.

ठळक मुद्देपुन्हा दोन शेळ्या फस्त

ऑनलाईन लोकमतआकोली : न्यु बोर अभयारण्याला लागून असलेल्या गावात वाघाने दहशत निर्माण केली आहे. वाघाच्या या दहशतीमुळे सुसूंदचे नागरिक चांगलेच भयभीत झाले आहे. वाघाच्या दहशतीमुळे दिवसाही शेतकरी शेतात जाण्याकरिता घाबरत असल्याचे वास्तव आहे. या वाघाने बोरखेडी व सुसूंद येथील दोन शेळ्या दोन वेगवेगळ्या घटनेत फस्त केल्याने नागरिक आणखीच धास्तावले आहे.खरांगणा वनपरिक्षेत्राच्या बोरखेडी येथे सायंकाळी शेळ्यांचा कळप घराकडे येत असतांना गावाजवळ असलेल्या बेशरमच्या झुडपात लपून असलेल्या वाघाने हल्ला केला. कळपातून रंगदेव मरस्कोल्हे यांच्या मालकीची शेळी उचलून नेत फस्त केली. सुसूंद येथे सातत्याने पाळीव प्राण्यावर हल्ले होत असल्याने व शेत शिवारात वाघाचा वावर असल्याने शेतकरी, शेतमजूर भयभीत आहे. चंपा शिवारात शेळ्यांचा कळप चरत असताना लेंडे यांच्या शेताजवळ कळपावर वाघाने हल्ला केला. यात गौतम सोनटक्के यांची शेळी फरफटत नेली. यापूर्वी चार शेळ्या वाघाच्या भक्षस्थानी पडल्या असून दोन गोºहे मरणाच्या दारात उभी आहेत.सुसूंद, सहेली येथील शेतकऱ्यांची कामे प्रभावित झाल्यामुळे वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी वनपरिक्षेत्र अधिकारी ए.एस. ताल्हण यांना निवेदनातून केली. सुसूंद परिसरात उन्हाळी मशागतीची कामे प्रभावित झाली आहेत. शेतमजूर कामाला जायला घाबरतात असे पोलीस पाटील वसंत सपकाळ यांनी सांगितले.

टॅग्स :Tigerवाघ