शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

तुरीची सुधारित जात ठरली शेतकऱ्यासाठी वरदान

By admin | Updated: January 26, 2017 01:59 IST

परंपरागत शेतीची कास सोडून सुधारित जातीच्या वाणाचा वापर केल्यास न परवडणारी शेती फायद्याची होऊ शकते. हा

अधिकाऱ्याकडून पाहणी : बोथली येथील शेतकऱ्याची यशोगाथा फनिंद्र रघाटाटे ल्ल रोहणा परंपरागत शेतीची कास सोडून सुधारित जातीच्या वाणाचा वापर केल्यास न परवडणारी शेती फायद्याची होऊ शकते. हा अनुभव बोथली येथील अल्पभूधारक आदिवासी शेतकरी श्यामराव लक्ष्मण कुरवाडे यांना आला. त्यांची तुरीची शेती इतर शेतकऱ्यांना अनुकरणीय व प्रेरणादायी ठरणारीच आहे. बोथली येथील श्यामराव कुरवाडे यांच्याकडे तीन एकर शेती आहे. त्यांनी एक एकर शेतात मध्यप्रदेशातून तुरीचे बियाणे आणून त्यांची सोयाबीनमध्ये लागवड केली. अधिक खर्च न करताही आज शेतात तुरीचे पीक उभे आहे. त्यात पाच व सहा दाण्यांची शेंग असून दाने चांगले टपोरे आहेत. एक एकरात १२ ते १५ क्विंटल उत्पादन होणार, अशी खात्री त्यांनी व्यक्त केली. पेरणी, निंदण, एक खताची मात्रा एवढ्या अल्प खर्चात त्यांना होणारे उत्पादन नक्कीच फायद्याचे आहे. ही शेती इतर शेतकऱ्यांना अनुकरणीय आहे. शेताला नुकतीच कृषी सहायक एस. एस. खोंडे यांनी भेट दिली. याप्रसंगी सदर शेतकऱ्याला पुढील वर्षासाठी तुरी बाजारात न विकता बियाणे म्हणून विकण्याचा सल्ला दिला. या तुरीची कापणी करून त्यांची मळणी करताना कुठल्याही प्रकारची भेसळ होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचनाही दिल्यात. सुधारित बियाण्यांचा वापर केल्यास उत्पादन वाढू शकते, हेच सदर शेतकऱ्याने यातून सिद्ध केले आहे. पेरणीच्या वेळी वाणाची शहानिशा करून लागवड केल्यास शेतीतील नकारात्मकता कमी होण्यास मदत होईल, हे वास्तव आहे. पारंपरिक पिकांतही नफ्याची शेती ४कापूस, सोयाबीन, तूर, गहू, चना ही पिके पारंपरिक आहे. गत कित्येक वर्षांपासून शेतकरी ही पिके घेत आला आहे. या पिकांमध्ये नवनवीन आणि सुधारित वाणाच्या बियाण्यांचा वापर केल्यास तोट्यातील शेती नफ्याची होऊ शकते, हे बोथली येथील शेतकऱ्याने सिद्ध केले आहे. परिसरातील अन्य शेतकऱ्यांनीही सुधारित वाणांचा वापर करून शेती नफ्याची करणे गरजेचे झाले आहे.