शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन उत्पादकांना बोनसचा दगा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 23:32 IST

दिवाळी बोनस अशीच सोयाबीन पिकाची ओळख. परंतु, यंदा आवश्यक तेव्हा पिकाला पावसाचे पाणी न मिळाल्याने सध्या सोयाबीन पिकाच्या उताºयात घट येत असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देएकरी उत्पादनात होेतेय घट : दिवाळी सणादरम्यान जिल्ह्यातील शेतकºयांची वाढली चिंता

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : दिवाळी बोनस अशीच सोयाबीन पिकाची ओळख. परंतु, यंदा आवश्यक तेव्हा पिकाला पावसाचे पाणी न मिळाल्याने सध्या सोयाबीन पिकाच्या उताºयात घट येत असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. गत वर्षीच्या तूलनेत यंदा सोयाबीनच्या उताºयात मोठी तफावत येत असल्याने दिवाळी बोनस पिकांनेच दगा दिल्याचे शेतकºयांकडून बोलले जात असून सदर परिस्थितीने शेतकºयांची चिंता वाढली आहे.यंदाच्यावर्षी अनेक शेतकºयांनी समाधानकारक पाऊस होईल या आशेने कपाशी व तूर पिकाला फाटा देत सोयाबीन पिकाची लागवड केली. सुरूवातीला पावसाने दगा दिला;पण वेळोवळी झालेल्या पावसामुळे सोयाबीन पिकाची जोमाने वाढ झाली. हिरवेगार सोयाबीन पीक शेग भरण्याच्या अवस्थेत आले असता पून्हा पावसाने पाठ फिरवल्याने पाहिजे तशी शेंग भरली नाही. त्यातच महावितरणच्यावतीने भारनियमन सुरू करण्यात आल्याने ओलिताची सोय असलेल्या अनेक सोयाबीन उत्पादक शेतकºयांना वेळीच पिकाला पाणी देता आले नाही. त्यामुळे सध्या सोयाबीनच्या उताºयात कमाचीची घट येत असल्याचे शेतकरी सांगतात.एक एकरात लावण्यात आलेल्या सोयाबीन पिकासाठी यंदा शेतकºयांना अखेरपर्यंत सुमारे १२ हजार रुपये खर्च आला. परंतु, त्याच्या तुलनेत सोयाबीनचे उतारेच येत नसल्याने शेतकºयांच्या अडचणीत भर पडली आहे. गत वर्षी एकरी आठ ते दहा पोते सोयाबीनचे उतारे आले होते. तर यंदा एकरी चार ते पाच पोतेच सोयाबीनचे उतारे येत असल्याचे शेतकºयांकडून सांगितले जात आहे. एकूणच शेतकºयांसाठी दिवाळी बोनस म्हणून ओळख असलेल्या सोयाबीन पिकाने यंदा जिल्ह्यातील शेतकºयांची कंबरच मोडली आहे. शिवाय दगाच दिल्याचे शेतकºयांकडून बोलले जात आहे.दीड एकरात झाले केवळ दीड पोते सोयाबीनयंदाच्या वर्षी सोयाबीन साथ देईल अशी आशा शेतकºयांना होती. परंतु, अनेकांची आशा आशाच राहिल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. देवळी येथील शेखर कामडी नामक शेतकºयाला दीड एकरात केवळ दीड पोते सोयाबीन झाल्याचे सांगण्यात येते. ऐन दिवाळीच्या तोंडावर दिवाळी बोनस पिकाने दगा दिल्याने कृषी विभागासह महसूल विभागाच्या कर्मचाºयांनी सर्वेक्षण करून शेतकºयांना शासकीय मदत द्यावी, अशी मागणी आहे.