शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट

By admin | Updated: August 31, 2014 00:00 IST

कुठल्याही वैद्यकीय शाखेची अधिकृत पदवी नसताना फिजीसियन व सर्जन, असे फलक लाऊन ग्रामीण भागात सर्रास वैद्यकीय व्यवसाय केला जात आहे. आरएमपी ते एमबीबीएस, अशा पदव्या

पिंपळखुटा : कुठल्याही वैद्यकीय शाखेची अधिकृत पदवी नसताना फिजीसियन व सर्जन, असे फलक लाऊन ग्रामीण भागात सर्रास वैद्यकीय व्यवसाय केला जात आहे. आरएमपी ते एमबीबीएस, अशा पदव्या नावापूढे लिहून अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांचे ग्रामीण भागात नेटवर्क तयार झाल्याचे दिसते. तालुका तसेच जिल्हा आरोग्य यंत्रणेचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. संबंधित डॉक्टरांचा शोध घेऊन कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. तालुक्यातील ग्रामीण, दुर्गम तसेच आदिवासी बहुल गावांत बोगस डॉक्टरांना उधानच आले आहे. ग्रामस्थांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन अनेकांनी वैद्यकीय व्यवसाय थाटल्याचे दिसून येत आहे. हंगामाच्या दिवसांत दुर्गम भागातून रुग्णांना संकटकाळी आरोग्य उपचार केंद्रापर्यंत पोहोचता येत नाही. यात वेळही जातो. शिवाय ग्रामीण भागात साधनेही मिळत नाही. अशा वेळी हे डॉक्टर रुग्णाकडे जाऊन महागडे उपचार करतात; पण यामुळे रुग्णांना थेट मृत्यूच्या दारात उभे राहावे लागत असल्याचे अनेकांचे अनुभव आहेत. तालुक्यातील अशा डॉक्टरांच्या जीवघेण्या उपचारामुळे रुग्णांच्या जीवन-मरण्याचा प्रश्न निर्माण होतो; पण केवळ नाईलाज असल्याने उपचार करून घ्यावे लागतात. बरेचदा मलेरिया, महिला व पुरुषांतील नपुसंकत्व, स्त्रियांचे वंधत्व तसेच यंत्रणा उपलब्ध नसताना लहान बाळांचे लसीकरण करण्याचा उद्योगही हे डॉक्टर करताना दिसतात. वेळेवर होणारे उपचार व मिळणारी औषधी यामुळे रुग्णांना समाधान होत असल्याने रुग्ण याबाबत कधीच ओरड करीत नाही. गावोगावी आशा आरोग्य स्वयंसेविका उपलब्ध आहे; पण त्यांच्याकडे प्राथमिक उपचाराकरिता पूरेसा औषधी उपलब्ध राहत नाही. आशा गावातील आरोग्याबाबत संपर्कात राहात नसल्यानेही बोगस डॉक्टरांना संधी मिळते. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.(वार्ताहर)