शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
2
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
3
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
4
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
5
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
6
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
7
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
8
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
9
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
10
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
11
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
12
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
13
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
14
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
15
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
16
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
17
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
18
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
19
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
20
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?

विहिरीत युवकाचा मृतदेह आढळला

By admin | Updated: May 13, 2014 00:02 IST

येथील जुन्या तहसील कार्यालयाजवळ असलेल्या विहिरीत पुलगाव येथील एका युवकाचा मृतदेह आढळल्याने शहरात खळबळ माजली.

पुलगाव : येथील जुन्या तहसील कार्यालयाजवळ असलेल्या विहिरीत पुलगाव येथील एका युवकाचा मृतदेह आढळल्याने शहरात खळबळ माजली. मृतकाचे नाव मंगेश सुरेश हनुमंते (३८) रा. श्रीनगर कॉलनी असे असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही घटना सोमवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास उघड झाली. पुलगाव-विरूळ मार्गावर दोन दिवसांपूर्वी झालेल्या दरोड्याशी त्याचा संबध असल्याची चर्चा परिसरात असली तरी पोलिसांनी ही चर्चा खोटी असल्याचे सांगितले आहे.

पुलगाव शहरातील मंगेश हनुमंते हा फोटोग्राफीचा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह चालवित होता. शहरातील महाविर चौकात त्याचे मंगेश फोटो स्टुडीओ नामक दुकान आहे. त्याच्या याच व्यवसायातून त्याने अयोध्यानगर येथील प्रकाश राऊत यांच्या मुलाच्या लग्नाच्या चित्रीकरणाचे काम घेतले होते. या कामाकरिता रविवारी गेला तो रात्री परत आला नाही. दुसर्‍या दिवशी त्याचा शोध घेतला असता सोमवारी सकाळी ९ वाजता नाचणगाव-पुलगाव मार्गावरील जुन्या तहसील कार्यालयाजवळील विहिरीत त्याचे प्रेत असल्याची माहिती त्याच्या घरच्यांना मिळाली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी व परिसरातील नागरिकांनी घटनास्थळ गाठले. मृतदेहजवळ त्याचा कॅमेरा व विहिरीजवळ त्याची दुचाकी उभी होती. या व्यतिरिक्त घटनास्थळी दुसरी कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. मंगेश याला सिगारेट ओढण्याची सवय असल्याने तो तिथे गेला असावा व त्याचा तोल गेल्याने विहिरीत पडून त्याचा मृत्यू झाला असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. मंगेशचा घात की अपघात याचा तपास ठाणेदार राजेंद्र तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.(शहर प्रतिनिधी)