शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला मिळालेला नोबेल पुरस्कार मी ट्रम्प यांना समर्पित करते', मारिया कोरिना मचाडो यांचं विधान   
2
अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना नो एंट्री, तालिबानी फर्मानविरोधात संताप  
3
काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी फडणवीसांची तुलना नथुरामसी केल्याने भाजपा संतप्त, दिलं असं प्रत्युत्तर
4
'भोसले घराण्यामुळे शिवरायांची प्रेरणा रुजली, म्हणूनच नागपुरच्या मातीतून संघाचा जन्म झाला', सरसंघचालक मोहन भागवत यांचं विधान
5
पांड्याच्या प्रेमाचा स्वॅग! क्रिकेटरनं शेअर केली 'त्या' ब्युटीसोबतची रोमँटिक फोटो स्टोरी
6
चीनचं अमेरिकेला जशास तसं प्रत्युत्तर; चिनी जहाजांवर शुल्क लादताच उचललं मोठं पाऊल!
7
प्रवीण आमरेने दिलेले बूट नाही विसरणार; मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी सांगितली आठवण
8
'नोबेल समितीने शांती निवडण्याऐवजी राजकारण केलं', ट्रम्प यांना डावलताच 'व्हाईट हाऊस'चा थयथयाट
9
NZ W vs BAN W: अखेर वर्ल्ड चॅम्पियन न्यूझीलंडनं भोपळा फोडला! बांगलादेशचा १०० धावांनी उडवला धुव्वा
10
केबिनमध्ये बोलावलं अन्...; दारूच्या नशेत डॉक्टराचे नात्यातील महिलेसोबत संतापजनक कृत्य
11
आशिया कपची ट्रॉफी भारताला मिळूच देणार नाही, मोहसीन नक्वींनी आता खेळली अशी चाल 
12
‘मला तुझ्याकडे बोलावून घे’, विरहाने व्याकूळ झालेल्या शेफाली जरीवालाच्या पतीची भावूक पोस्ट, चाहते चिंतित  
13
नवी मुंबई विमानतळाला आरएसएसच्या नेत्याचे नाव देण्याची तयारी; रोहित पवारांचा भाजपवर आरोप
14
आरोग्य सचिवांच्या दौऱ्यापूर्वीच दहा डॉक्टरांचे राजीनामास्त्र, सावंतवाडीतील आरोग्य क्षेत्रात खळबळ
15
Royal Enfield: आता घरबसल्या बूक करा रॉयल एनफील्ड, 'हे' मॉडेल्स ऑनलाइन खरेदीसाठी उपलब्ध!
16
'बगराम हवाई तळ देणार नाही, जर तुम्हाला आमच्यासोबत...'; अफगाणिस्तानच्या मंत्र्याचा ट्रम्प यांना 'मेसेज', पाकिस्तानलाही इशारा
17
प्रेमासाठी काय पण! पाकिस्तानी कपलने सीमा ओलांडून भारतात केला प्रवेश, 'अशी' झाली पोलखोल
18
लष्करात नेमणूक झाल्यावर भव्य मिरवणूक, जंगी स्वागत; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन
19
यशस्वी जयस्वालनं वेस्ट इंडिजला झोडलं, एकाच खेळीत मोडले अनेक मोठे विक्रम!
20
Maria Corina Machado: व्हेनेझुएलाची 'आयरन लेडी', शांततेचं नोबेल मिळालेल्या मारिया कोरिना मचाडो कोण आहेत?

मंडळ अधिकाऱ्याला अटक

By admin | Updated: February 14, 2016 01:55 IST

नोकरीचे आमिष देऊन आठ ते दहा जणांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कोतवाल गजानन मडावी याला सावंगी पोलिसांनी अटक केली होती.

नोकरीचे आमिष प्रकरण : आरोपींची संख्या दोनवर्धा : नोकरीचे आमिष देऊन आठ ते दहा जणांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कोतवाल गजानन मडावी याला सावंगी पोलिसांनी अटक केली होती. त्याला पोलीस कोठडी ठोवण्यात आली असता त्याने दिलेल्या कबुलीत मंडळ अधिकारी योगेश निकम याचे नाव सांगितले. यावरून सावंगी पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री निकम याला अटक केली. त्याला शनिवारी न्यायालयात हजर केले असता १८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोतवाल गजानन मडावी रा. सालोड हिरापूर हा जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानी काम करायचा. त्याने नोकरीचे आमिष देऊन सालोड (हिरापूर) येथील आॅटोचालक विजय राऊत याच्यासह सात ते आठ जणांना नोकरीचे आमिष देत लाखो रुपयांचा गंडा घातल्याचे पोलिसांच्या तपासात समोर येत आहे. या प्रकरणी विजय राऊत याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सावंगी (मेघे) पोलिसांनी मडावी याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले. त्याला पोलीस कोठडी ठोठावण्यात आली असून तपास सुरू आहे. यात त्याला पोलिसांना अधिक विचारणा केली असमा त्याने या कामात त्याला मंडळ अधिकारी योगेश निकम याचे सहकार्य असल्याचे कबुल केले. त्याच्या कबुलीवरून पोलिसांनी मंडळ अधिकारी योगेश निकम याला रात्री १२.१० वाजता अटक केली. तत्पूर्वी पोलीस कोठडीत असलेल्या गजानन मडावी याच्याकडून पोलिसांनी सेवा पुस्तिका उपविभागीय अधिकाऱ्याचा रबर स्टॅम्प आदी साहित्य जप्त केले आहे. ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात सावंगी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष शेगावकर यांच्या प्रत्यक्ष हजेरीत कर्मचारी प्रदीप राऊत, ओमप्रकाश नागापुरे, दिलीप गेडे, विकास अवचट, नवनाथ मुंडे आदींनी केली.(प्रतिनिधी)कोतवालाचे मंडळ अधिकाऱ्याकडे बोटनोकरी देण्याच्या या प्रकरणात पोलीस कोठडीत असलेला कोतवाल गजानन मडावी याने या कामात त्याला मंडळ अधिकारी योगेश निकम याने याचे सहकार्य असल्याची कबुली दिली. त्याच्या कबुलीवरून सावंगी पोलिसांनी निकम याला मध्यरात्री अटक केली. या प्रकरणात योगेश निकम हा मुख्य आरोपी असल्याचे पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात उघड झाले असल्याचे सांगण्यात आले आहे. आरोपींची संख्या वाढण्याची शक्यताकोतवालापासून सुरू झालेल्या या प्रकरणात मंडळ अधिकारी आरोपी झाला. यामुळे वर्धेत नोकरी लावून देण्याकरिता मोठे रॅकेट सक्रीय असल्याचे नाकारता येत नाही. या प्रकरणात आणखी कोणाचे नाव येते याकडे साऱ्यांचे लक्ष आाहे.