शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात प्रथमच आढळला निळ्या शेपटीचा पाणपोपट

By admin | Updated: October 12, 2015 02:15 IST

वन्यजीव सप्ताह जिल्ह्यात सर्वत्र साजरा केला जात आहे. या सप्ताहादरम्यान निळ्या शेपटीचा पाणपोपट ज्याला इंग्रजीत ‘ब्ल्यू टेल्ड बी इटर’ असेही म्हणतात,...

पक्षी अभ्यासकांनी केली नोंद : बहार नेचर फाऊंडेशन करणार सूची जाहीर वर्धा : वन्यजीव सप्ताह जिल्ह्यात सर्वत्र साजरा केला जात आहे. या सप्ताहादरम्यान निळ्या शेपटीचा पाणपोपट ज्याला इंग्रजीत ‘ब्ल्यू टेल्ड बी इटर’ असेही म्हणतात, हा पक्षी जिल्ह्यात प्रथमच आढळला. पक्षी अभ्यासक व बहारचे सचिव दिलीप वीरखडे यांनी ही नोंद नुकतीच केलेली आहे.या पक्ष्याला निळ्या शेपटीचा राघू असेही नाव आहे. आपल्याकडे नियमित दिसणाऱ्या राघू पेक्षा हा पक्षी आकाराने मोठा असून डोळ्यालगत काळी पट्टी, गळ्यावरील भाग पिवळा, गळा व छातीवर तांबूस पट्टा असून पार्श्वभाग आणि शेपटी निळी असते. नर-मादी दिसायला सारखेच असतात. देशाच्या उत्तर व उत्तर पूर्वेकडील भागात याची वीण होत असून दक्षिणेकडे आंध्र कर्नाटकापासून श्रीलंका या भागात हे पक्षी हिवाळी पाहुणे असतात. या पूर्वी विदर्भात अगदीच तुरळक ठिकाणी या पक्ष्यांची नोंद घेण्यात आलेली आहे. साधारणत: पाणस्थळ जागा या पक्ष्यांची आवडती असून वर्धा शहरानजीक असलेल्या एका तलाव परिसराजवळ हे छायाचित्र घेऊन नोंद करण्यात आली. बहार नेचर फाऊंडेशनतर्फे वर्धा जिल्ह्यातील पक्षीसूची तयार करण्याचे काम सुरू असून ही सूची १२ नोव्हेंबर रोजी प्रकाशित केली जाणार असल्याचे कळविण्यात आले आहे. या पक्ष्यांचा अधिक अभ्यास व सर्वेक्षण करण्याची गरज फाऊंडेशनचे अध्यक्ष किशोर वानखडे, रमेश बाकडे, रवींद्र पाटील, संजय इंगळे तिगावकर, पराग दांडगे, राहुल तेलरांधे, पक्षीमित्र व अभ्यासक वैभव देशमुख, दीपक गुढेकर, डॉ. बाबाजी घेवडे, डॉ. जयंत वाघ, जयंत सबाने यांनी व्यक्त केली.(प्रतिनिधी)