शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

देवळीत शेताच्या वादातून रक्तपात; लहान भावाने मोठ्यास संपविले : तलवारीने केले सपासप वार

By रवींद्र चांदेकर | Updated: June 10, 2025 21:40 IST

शहरातील नागरिकांनी शेतात एकच गर्दी केली. पोलिसांनीही तातडीने घटनास्थळ गाठून आरोपीला गजाआड केले.

वर्धा : शेताचा वाद इतका विकोपाला गेला की, भावबंदकीच रक्तबंबाळ झाली. लहान भावाने रागाच्या भरात मोठ्या भावावर तलवारीने सपासप वार करून शेतातच ठार केले. ही घटना देवळीपासून तीन किलोमीटर अंतरावरील दिघी शिवारातील शेतात मंगळवारी सायंकाळी पावणेसहा वाजण्याच्या दरम्यान घडली. घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच, शहरातील नागरिकांनी शेतात एकच गर्दी केली. पोलिसांनीही तातडीने घटनास्थळ गाठून आरोपीला गजाआड केले.

शंकर नानाजी येळणे (६९, रा.देवळी) असे मृताचे नाव आहे, तर बाबा नानाजी येळणे (६०, रा.देवळी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. प्राप्त माहितीनुसार, आरोपी बाबा येळणे आणि मृतक शंकर येळणे दोघांचेही शेत आजूबाजूला असून, घटना घडण्यापूर्वी या दोघांमध्ये शेताच्या धुऱ्यावर वाद झाला. काही दिवसांआधी आरोपी आणि मृतक या दोघांचा लहान भाऊ साहेबराव येळणे याच्या शेतीचे साहित्य चोरीला गेले होते. या साहित्यात डवरे, तिफन, नांगर, पलंग, टेबल, तसेच ओलताच्या दहा पाइपचा समावेश होता. या चोरीची शहानिशा करीत असतांना साहेबराव येळणे याला बाबा येळणे याच्यावर संशय होता. त्यामुळे साहेबराव याने मोठा भाऊ शंकर येळणे यांच्यासोबत जाऊन देवळी पोलिसात तक्रार दिली होती. ही तक्रार मृतक शंकर येळणे याच्या सांगण्यावरून करण्यात असल्याचा बाबा येळणे याला संशय होता. त्यामुळे त्याचा शंकर येळणे या मोठ्या भावावर राग होता. शंकर येळणे याचा बदला घेण्याबाबत तो आधी बोललाही होता. त्यामुळे हा वचपा काढण्यासाठीच हा हत्याकांड घडल्याचे सांगितले जात आहे.

नागरिकांची गर्दी, पोलिसांचाही डेरासायंकाळच्या सुमारास दिघी शिवारात तलवारीने हत्या केल्याची बातमी शहरात पोहोचताच, अनेकांनी हातचे काम सोडून येळणे यांच्या रस्त्यालगतच्या शेताकडे धाव घेतली. मृतदेह शेतातच रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. लागलीच पोलिसांनीही पोहोचून घटनेचा पंचनामा केला. उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल चव्हाण आणि पोलिस निरीक्षक अमोल मंडलकर हेही घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत दोन्ही पोलिस अधिकाऱ्यांसह त्यांचे सहकारी घटनास्थळी उपस्थित होते.

मृतदेह पाठविला सामान्य रुग्णालयातघटनेनंतर पोलिसांनी हत्येप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपी बाबा येळणे याला गजाआड केले, तसेच पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेण्यात आला. मृतक शंकर येळणे याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी वर्ध्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला. पुढील तपास देवळी पोलिस करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी