शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

आई-वडिलांना बघून जान्हवीच्या चेहऱ्यावर फुलला आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 21:04 IST

जाती, धर्माच्या नावावर सध्या देशात वातावरण तपले असताना काही गावे अशीही आहेत जे सामाजिक एकतेचे प्रतिक म्हणून ओळखली जातात. आई-वडिलांपासून दुरावलेली तीन वर्षीय जान्हवी मशीद समोर रडत असल्याचे काहींना निदर्शनास आले. यावेळी जाती व धर्माचा विचार न करता काही सुजाण नागरिकांनी तिला घेऊन मंदिराकडे धाव घेतली.

ठळक मुद्देसामाजिक बांधिलकीचा दिला परिचय

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जाती, धर्माच्या नावावर सध्या देशात वातावरण तपले असताना काही गावे अशीही आहेत जे सामाजिक एकतेचे प्रतिक म्हणून ओळखली जातात. आई-वडिलांपासून दुरावलेली तीन वर्षीय जान्हवी मशीद समोर रडत असल्याचे काहींना निदर्शनास आले. यावेळी जाती व धर्माचा विचार न करता काही सुजाण नागरिकांनी तिला घेऊन मंदिराकडे धाव घेतली. तेथे लाऊडस् स्पिकरवर अनाऊसमेंट करण्यात आली. हरविलेल्या जान्हवीच्या समोर आई-वडील पोहोचताच तिच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. ही घटना बुधवारी सकाळी नजीकच्या रसुलाबाद येथे घडली. रसुलाबाद येथे मनसागीर महाराज स्मृतीदिन सोहळ्याचे औचित्य साधून पालखी-मिरवणूक व यात्रा उत्सवात सहभागी होण्यासाठी चना टाकळी येथील शंकर बावणे हे पत्नी व तीन वर्षीय मुलीसोबत आले होते. खेळता-खेळता तीन वर्षीय जान्हवी आई-वडिलांपासून दुरावली. सदर मुलगी रसुलाबाद येथील मशीद समोर रडत असल्याचे गावातील काहींच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ रडत असलेल्या मुलीला धीर देत नाव, गाव विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुरूवातीला तिच्याकडून पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याने त्या व्यक्तींनी मुलीला घेऊन मंदिर गाठले. तेथे लाऊडस् स्पिकरवर तीन वर्षीय मुलगी मिळाल्याची अनाऊसमेंट करण्यात आली. याच दरम्यान जान्हवीच्या शोधार्थ जीवाचे रान करीत असलेल्या तिच्या आई-वडिलांना ही माहिती मिळाली. त्यांनी तात्काळ मंदिर गाठले. आई-वडिलांना बघून घाबरलेल्या आणि रडत असलेल्या जान्हवीच्या चेहºयावर आनंद फुलला होता. सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील व ग्रामस्थांच्या उपस्थितीत जान्हवीला तिच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले.सोहळा ठरतोय धार्मिक एकतेचे प्रतीकरसुलाबाद येथे आयोजित करण्यात येणाऱ्या मनसागीर महाराज स्मृतीदिन सोहळ्यात विविध जाती व धर्माचे नागरिक सहभागी होतात. येथील हा कार्यक्रम एक प्रकारे धार्मिक एकतेचे प्रतीक आहे.

टॅग्स :Missingबेपत्ता होणं