वैद्यकीय जनजागृती मंचचा उपक्रम : पर्यावरणपूरक निर्मल विसर्जन मोहीमवर्धा : वैद्यकीय जनजागृती मंचद्वारे पर्यावरणपूरक निर्मल विसर्जन मोहीम राबविली जात आहे. यात स्थानिक शारदा मूकबधिर, निराधार व अंध विद्यालयाने संयुक्तपणे श्री शारदा देवीचे विसर्जन हनुमान टेकडीवर तयार केलेल्या निर्मल विसर्जन कुंडात केले. अंध विद्यार्थ्यांचे हे डोळस विसर्जन सामान्यांसाठी आदर्शवतच ठरले.पर्यावरणपूरक विसर्जन मोहिमेत सक्रीय सहभाग देऊन अंध-अपंग विद्यार्थ्यांनी समाजाला डोळसपणाचा प्रत्यय दिला. शाळेचे मुख्याध्यापक व व्हीजेएमचे सदस्य श्याम भेंडे यांचा पुढाकार व शारदा कला व सांस्कृतिक मंडळाच्या अध्यक्ष उषा फाले यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांना पर्यावरण रक्षणाचा कृतीशील अनुभव आला. विद्यार्थ्यांनी टेकडीवरील वृक्ष संवर्धन कार्यही जवळून अनुभवले. या निर्मल विसर्जन कृतीने सर्वांचे लक्ष वेधत विद्यार्थ्यांच्या डोळसपणाचे कौतुक होत आहे. विसर्जन कार्याला कर्मचारी प्रकाश नरनवरे, स्वप्नील मानकर, मंजूषा कदम, ज्योती लोखंडे, अतुल ताकतोडे, रोशन उके, गोपाल गवळी, शरद कामतकर, बजरंग नांदेकर, अमित चहाण्दे तसेच वैद्यकीय जनजागृती मंचच्या सदस्यांनी सहकार्य केले.(कार्यालय प्रतिनिधी)
मूकबधिर, अंध विद्यार्थ्यांनी केले डोळस विसर्जन
By admin | Updated: October 17, 2016 01:04 IST