शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सिलिंडरच्या स्फोटात घराची राख

By admin | Updated: April 27, 2017 00:41 IST

मेणखात येथे सिलिंडरचा स्फोट झाल्याने घराला आग लागली. यात संपूर्ण घर जळून खाक झाले.

मेणखात येथील घटना : जीवित हानी टळली समुद्रपूर : मेणखात येथे सिलिंडरचा स्फोट झाल्याने घराला आग लागली. यात संपूर्ण घर जळून खाक झाले. सुदैवाने घरात कुणी नसल्याने जीवितहानी टळली. असे असले तरी एक बैल भाजला असून एकाच्या डोळ्याला आस लागली. ही घटना सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडली. जाम (चौरस्ता) येथून तीन किमी अंतरावरील मेणखात येथील ताराबाई पांडुरंग उरकुडकर (५५) यांच्या घरातील सिलिंडरचा स्फोट झाला. यात भांडे, धान्य, कपडे जळून खाक झाले. घरातील तीन तोळे सोने, दहा हजार रुपये रोख जळाले. ताराबाई घरी एकट्याच राहतात. घटनेच्या वेळी गॅसवर चहा ठेवून त्या बोर आल्याने जीवितहानी टळली; पण घराचे छप्पर उडाले. आगीचे लोळ ज्ञानेश्वर वानखेडे यांच्या गोठ्यापर्यंत गेले. यात गोठा, कुटार, थ्रेशर इंजिन जळाले व बैल भाजला गेला. ज्ञानेश्वर वानखेडे यांच्या डोळ्याला आस लागली. रमेश विहीरकर, कैलाश उईके, विठ्ठल सुरजूसे, राहूल उईके, दिनकर मंगरूळकर, गोपाल कच्छवा, भगवान महाकाळकर, देविदास दाते, गजानन दाते, दिनेश दाते यासह हिंगणघाट येथील अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली. तलाठी सुधीर पाटील, उमेश पोटे यांनी पंचनामा करून अहवाल सादर केला.(तालुका प्रतिनिधी) दोन एकरातील डाळींब स्वाहा नारायणपूर : पाठर येथील ज्ञानेश्वर किसनाजी धोटे यांच्या दोन एकर शेताला आग लागली. यात नांदी फाऊंडेशन अंतर्गत लागवड केलेल्या डाळींब पिकाची ६०० ते ७०० झाडे, ओलितासाठी वापरण्यात येणारे ड्रीप पाईप व इतर साहित्य जळून खाक झाले. यात अंदाजे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले. ही घटना मंगळवारी घडली. शेतकऱ्याने तलाठी व कृषी सहायकांना माहिती दिली. वृत्त लिहिपर्यंत ते घटनास्थळी पोहोचले नव्हते. आगीचे नेमके कारण कळू शकले नाही.