शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

अंधारात राहून दुसऱ्यांची घरे उजाळणारे पणती कारागीर

By admin | Updated: October 28, 2016 01:39 IST

कोणताही सण आनंद व उत्साहाचे प्रतिक असतो. दिवाळी हा सण आपल्या जीवनात सुख समाधान आणत असतो;

बाजारात पणत्यांची आरास : शिक्षणाचा गंध नाही की, जेवणाची भ्रांत नाहीवर्धा : कोणताही सण आनंद व उत्साहाचे प्रतिक असतो. दिवाळी हा सण आपल्या जीवनात सुख समाधान आणत असतो; पण शहरातील मुख्य मार्गावर आपल्या कुटुंबासह मातीच्या मूर्त्या व दिवे विकणाऱ्या लोकांसाठी हा पर्व संघर्षमय असतो. दुसऱ्यांची घरे उजळण्यासाठी दिवसरात्र श्रम करीत धडपडणाऱ्या या लोकांच्या घरात खरा प्रकाश पोहोचतच नाही. तुटपुंज्या मिळकतीत समाधान माणून या लोकांच्या पिढ्या जीवन कंठत आहेत. सणानिमित्त जेवढी कमाई होत असेल तेवढी कमाई करावी व दोन वेळचे जेवण मिळू शकेल. आपल्या संपूर्ण कुटुंबासह वेगवेगळ्या ठिकाणी विस्थापितांचे जीवन जगणाऱ्या या कुटुंबातील मुलांना हे देखील माहिती नसते की, दिवाळी काय असते. मोठे साहित्य विकत आहेत, म्हणून आम्हीही दोन पैसे कमविण्यासाठी बसलो आहे, असे ते सांगतात. आज सायंकाळी आपल्या मुलांना भरपेट जेवण मिळेल याचा आनंद या विक्रत्यांच्या चेहऱ्यावर झळकत असतो. सोबतच मुलांच्या चेहऱ्यावरही आनंद दिसून येतो. तो आनंद व प्रकाश दिव्याच्या उजेडापेक्षा कित्येक पट अधिक असतो. दिव्यांचा हा सण देशात उत्साहात साजरा केला जातो. या सणानिमित्त खरेदीही मोठ्या प्रमाणावर करण्यात येते. शहराच्या मुख्य मार्गावर संपूर्ण कुटुंबासह फाटलेल्या चादरीवर मातीचे दिवे व मूर्ती ठेवून विकणारे कुटुंब काही न सांगता खूप काही सांगून जातात. त्यांच्याशी संपर्क साधल्यावर ते प्रारंभी पोलिसांचा ससेमिरा, त्या जागेवरून हटविणार तर नाही ना, असे विविध प्रश्न त्यांच्या मनात निर्माण होतात. पैसे कमविण्यासाठी खूप मेहनत करीत मुलेही साहित्याच्या बाजूला बसलेले असतात. दोन-तीन गठ्ठ्यांत संपूर्ण कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे साहित्य साठवून हे लोक प्रत्येक सणाला वेगवेगळ्या शहरात जातात. शिक्षण काय असते, हे यांच्या मुलांना माहिती नसते. केवळ जगण्यासाठी काम करून संघर्षमय जीवन जगणे हेच त्यांना माहिती आहे. हे साहित्य विक्री केल्यास आपल्याला जेवण मिळणार या आशेने ते रस्त्यावरील ग्राहकांना आवाज देत त्यांना वस्तू घेण्यास प्रवृत्त करीत मालाची विक्री करताना दिसतात. इतरांसारखे दिवाळीच्या सायंकाळी त्यांच्या घरी उजेड काय तो असेल; पण त्यांचे जीवनच उघड्यावर आहे. पणती विकल्यावर हे किती रुपये कमवित असतील, यात ते चांगले जगू शकतील काय, हा प्रश्नच आहे.(कार्यालय प्रतिनिधी)