वर्धा : माजी खासदार दत्ता मेघे यांच्यासह भाजपमध्ये प्रवेश घेतलेल्या ६५ कार्यकर्त्यांचा भाजपश्रेष्ठींनी जिल्हा कार्यकारिणीत स्थान दिले आहेत. कार्यकर्त्यांचे कार्यक्षेत्र विचारात घेऊन संबंधित आघाड्यांमध्ये हे समायोजन करण्यात आल्याची घोषणा सोमवारी करण्यात आली. सागर मेघे, गिरधर राठी, प्रदीप ठाकूर, साधना सराफ, विलास कांबळे, साबीर कुरेशी यांचा राज्य कार्यकारिणीत समावेश करण्याचा प्रस्ताव पक्षश्रेष्ठींकडे पाठविला असून तो लवकरच संमत होतील, अशी माहिती भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. डॉ. पंकज भोयर व संजय शिंदे यांची जिल्हा उपाध्यक्षपदी तर अशोक कलोडे, प्रफुल्ल बाहे, विलास दौड, मनीष देवढे यांची चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. रवींद्र गोसावी, शंकर थोरात, अरुण उईके, हरीश पारिसे, मनोहर सोमनाथे, यशवंत होले, गोपाल कच्छवा, रवी वैद्य, भगतसिंग धंदोरिया, रामविलास साहु, विलास खुनकर, जयंत गोमासे, गजानन उमक, पुंडलिक पांडे यांची कार्यकारिणी सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तालुका व शहर कार्यकारिणीत १४ जणांचा समावेश करण्यात आला आहेत. वर्धा शहर कार्यकारिणीत महेश भाटीया, हिंगणघाट तालुका व शहरमध्ये डॉ. विजय पर्बत, प्रदीप जोशी, धनराज चांभारे, संजय उभाट, समुद्रपूरमध्ये डॉ. इश्वर इंगोले, रवी वैद्य, विनोद कुटे, सेलूमध्ये अशोक रतनवार, पुलगावमध्ये गोलू पनीया, प्रशांत डफळे, अरविंद भार्गव, पवन साहू यांचा समावेश आहे. महिला मोर्चात सरस्वती मडावी, गीता मेश्राम, कैसर अंजुम यांची जिल्हा उपाध्यक्षपदी वर्णी लागली. पुष्पा मोहोड यांची देवळी विधानसभा प्रमुखपदी, अरुणा चाफले यांची कार्यकारिणीत निवड झाली. युवा मोर्चात जिल्हा सरचिटणीसपदी निलेश किटे, उपाध्यक्ष वरुण पाठक, चिटणीसपदी राहुल उरकांदे, रोशन कठाडे व शरद सहारे कार्यकारिणी सदस्य, तर विपीन खुळे यांची सेलू तालुका चिटणीसपदी वर्णी लागली. अनु. जाती मोर्चात मदन चावरे, अशोक दोडके, देवेंद्र नाईक, कैलाश राखडे यांची जिल्हा चिटणीसपदी, वरुण पांडे वर्धा शहर अध्यक्ष, सिद्धार्थ सवाई व संजय वघेल यांची वर्धा शहर चिटणीसपदी, तर अनु. जमाती मोर्चात मोहन मसराम जिल्हा उपाध्यक्ष व संदीप मडावी यांची चिटणीसपदी निवड करण्यात आली. अल्पसंख्यक आघाडीत नौशाद शेख, सुभान शेख व अमीन शेख (वर्धा), रफीक गफूर अली सयुद व फिरोज शेख(सेलू), मोहम्मद इकबाल शेख हनिफ यांची तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. यावेळी खा. रामदास तडस, माजी खासदार सुरेश वाघमारे, डॉ. पंकज भोयर, विलास कांबळे, मिलिंद भेंडे, श्रीधर देशमुख, मनोज तरारे उपस्थित होते.(जिल्हा प्रतिनिधी)
भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीत ६५ मेघे समर्थकांची वर्णी
By admin | Updated: August 18, 2014 23:40 IST