शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
6
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
7
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
8
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
9
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
10
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
11
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
12
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
13
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
14
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
15
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
16
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
17
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
18
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
19
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
20
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

भाजपचे जनसंपर्क कार्यालय गर्दीने फुलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 23:45 IST

लोकसभा मतदारसंघाचे निकाल हळूहळू बाहेर पडताच भाजप आघाडीवर असल्याचे चित्र स्पष्ट झाले अन् जनसंपर्क कार्यालय गर्दीने गजबजलेले दिसून आले. दरम्यान, कार्यालयात आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार विद्यमान खासदार रामदास तडस यांचे नागपूर मार्ग स्थित दादाजी धुनिवाले चौक परिसरात जनसंपर्क कार्यालय आहे.

ठळक मुद्देआमदारांसह सेनेच्या पदाधिकाऱ्यांचीही हजेरी : पदाधिकाऱ्यांत आनंदी आनंद

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : लोकसभा मतदारसंघाचे निकाल हळूहळू बाहेर पडताच भाजप आघाडीवर असल्याचे चित्र स्पष्ट झाले अन् जनसंपर्क कार्यालय गर्दीने गजबजलेले दिसून आले. दरम्यान, कार्यालयात आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार विद्यमान खासदार रामदास तडस यांचे नागपूर मार्ग स्थित दादाजी धुनिवाले चौक परिसरात जनसंपर्क कार्यालय आहे. एरवीही या कार्यालयात रेलचेल पाहायला मिळते. गुरुवारी मतमोजणी असल्याने सकाळपासूनच जनसंपर्क कार्यालयात पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू होती. कार्यालयात आलेल्या कर्मचाºयांकडून बडदास्त करणे सुरू होते. कार्यालयापुढील रस्ता आणि परिसर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या चारचाकी, दुचाकी वाहनाने फुलून गेला होता.जनसंपर्क कार्यालय पदाधिकाºयांच्या गर्दीने फुल्ल झाले होते. मात्र, बसायला जागा अपुरी पडत असल्याने कित्येक जण अंगणात खुर्ची टाकून मोबाईलवर निकाल पाहत होते. याशिवाय कार्यालयात असलेले टीव्ही, संगणक आणि मोबाईलच्या माध्यमातून निकालाकडे उपस्थित पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते लक्ष लावून होते. तर काही पदाधिकारी मतमोजणीच्या ठिकाणी असलेल्या प्रतिनिधींच्या संपर्कात राहत कितवी फेरी आहे, कितीने पुढे आहे, अशी विचारणा करीत होते. किती मताधिक्याने विजयी होणार, म्हणून कार्यकर्त्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. तसेच मतदारसंघनिहाय प्रत्येक फेरीत मिळालेल्या मतदानावरून आकडेमोड करताना दिसून आले. कोठे शत-प्रतिशत मते मिळाली, याचीही पक्षातील पदाधिकारी कारणमिमांसा करीत होते. हळूहळू निकालाचा कौल भाजपच्या बाजूने दिसताच भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मित्रपक्षाच्या पदाधिकाºयांनी जनसंपर्क कार्यालय गाठले. कार्यालयात आमदार डॉ. पंकज भोयर, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेश सराफ यांच्यासह जिल्हा परिषदेतील पदाधिकारी, विविध समितीच्या सभापतींनीही हजेरी लावली. कार्यालयात चहा-पाण्यासोबतच भोजनाचीही व्यवस्था करण्यात आली होती.असा वाढत गेला कार्यकर्त्यांचा उत्साहगुरुवारी सकाळी ८ वाजतापासून भारतीय खाद्य निगममध्ये मतमोजणीला सुरुवात झाली. दरम्यान मतमोजणीच्या दुसºया-तिसºया फेरीपासूनच रामदास तडस आघाडीवर असल्याचे निदर्शनास येताच कार्यकर्त्यांत प्रचंड उत्साहाचे वातावरण होते. चवथ्या आणि पाचव्या फेरीनंतर मताधिक्य वाढतच गेल्याने अनेक कार्यकर्त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. अनेकांनी मिठाई बोलावून एकमेकांचे तोंड गोड गेले. इतक्या मताधिक्याने साहेब विजयी होतील, अशीही दावेदारी केली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकाल