शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही? कंपन्यांची 'ही' चलाखी पाहून ग्राहक संतापले
2
'दादा, ओला दुष्काळ जाहीर करा'; अजित पवार शेतकऱ्यांना म्हणाले, "आता आम्हाला पाहणी तर..."
3
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
4
ECINET: मतदार यादीतून नाव काढणं आता सोपं नाही; निवडणूक आयोगानं सुरू केली नवी 'ई-साइन' प्रणाली
5
पाकिस्तान युद्धात सैनिक लढला होता, नंतर पेन्शनशिवाय काढून टाकले; पत्नीला ५७ वर्षांनंतर मिळाला न्याय
6
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
7
Ultraviolette ने कमाल केली, X47 Crossover मोटरसायकल भारतात आली: 2.74 लाख रुपयांपासून किंमत सुरु!
8
भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अचानक गरजला! अंदमानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला
9
Rapido मुळे अचानक Swiggy कडे आले २४०० कोटी रुपये, नक्की काय आहे प्रकरण?
10
एकाच वेळी पाच-सहा मराठी सिनेमे रिलीज, कसं व्हायचं? प्रसिद्ध गायकाने मांडलं मत, इंडस्ट्रीबद्दल म्हणाला...
11
चांगले मायलेज हवे असेल तर टायरमधील हवा नेमकी किती असावी? टायरवाला तर ४० पीएसआय भरतो...
12
Dussehra 2025: दसऱ्याला गुपचूप करा 'हे' धनप्राप्तीचे उपाय; कुबेर महाराज होतील प्रसन्न
13
घरी रोख रक्कम ठेवण्याची मर्यादा किती? जाणून घ्या आयकर विभागाचा महत्त्वाचा नियम
14
एच-१बी व्हिसा धोरणावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३६ तासांतच यू-टर्न का घेतला? 
15
सकाळ सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार करमाळ्यात; पूरग्रस्त भागाची पाहणी सुरू
16
ग्राहकांची झुंबड! वाहनांच्या विक्रीने नवा उच्चांक गाठला; कोणत्या क्षेत्रांना किती होणार फायदा?
17
सोलापुरातील महापुराचा रेल्वे वाहतुकीला फटका; वंदे भारत, सिद्धेश्वर एक्सप्रेसला उशिरा, अनेक गाड्या सोलापूर विभागात थांबविल्या
18
UPI EMI: आता UPI पेमेंट करताना EMI चा पर्याय निवडता येणार; NPCI आणणार नवी सुविधा
19
रोज-रोज चटणी भात... पतीने केली चिकनची मागणी; पत्नीने नकार देताच उचलले टोकाचे पाऊल!
20
"अवामवर बॉम्बस्फोट करुन वेळ मिळाला तर...", भारताच्या क्षितिज त्यागी यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानला सुनावले

भाजपाची जयस्वाल गटाला अध्यक्षपदाची आॅफर ?

By admin | Updated: November 29, 2015 02:52 IST

येथील नगरपंचायत निवडणुकीत कुणाहीकडे स्पष्ट बहुमत नाही. त्यामुळे काँग्रेस (जयस्वाल गट), भाजपा व दप्तरी गट ...

सेलू नगर पंचायत अध्यक्ष व उपाध्यक्षाची निवडणूक : सेलूच्या पहिल्या नगराध्यक्षाच्या निवडणुकीला राजकीय ‘ग्लॅमर’ प्रफुल्ल लुंगे सेलू येथील नगरपंचायत निवडणुकीत कुणाहीकडे स्पष्ट बहुमत नाही. त्यामुळे काँग्रेस (जयस्वाल गट), भाजपा व दप्तरी गट यापैकी कोणतेही दोन गट एकत्र आल्याशिवाय नगर पंचायतीचा अध्यक्ष होवू शकत नाही. हे वास्तव आहे. अध्यक्षपदाचे नामांकन परत घेण्याचा शेवटचा दिवस शुक्रवार होता. तीनपैकी एकाही गटाने नामांकन परत घेतले नाही. यामुळे दप्तरी-जयस्वाल गटाच्या हातमिळविणी प्रश्नांकित आहे. अशातच भाजपाने जयस्वाल गटाला थेट अध्यक्षपदांची आॅफर दिल्याची चर्चा रंगत आहे. यामुळे खुर्चीच्या मोहापोटी दप्तरी-जयस्वाल गटाची झालेली युती विस्कटीत होत काँग्रेस-भाजपा अशी ‘अभद्र युती’, तर होणार नाही ना, असा वावळ्या उठू लागल्या आहे. या नव्या समीकरणाच्या गणितामुळे मतदार व कार्यकर्ते मात्र बुचकाळ्यात पडले आहेत. वेगाने होणाऱ्या या घडमोडींमुळे सेलूच्या पहिल्या नगराध्यक्षाच्या निवडणुकीला चांगलेच ‘ग्लॅमर’ प्राप्त झाले आहे. काँग्रेस (जयस्वाल गट) ५, दप्तरी गट ६, भाजपा- ३, अपक्ष-२ व बसपा-१ असे १७ सदस्य मतदारांनी निवडून दिले. यात कुणालाही एकहाती सत्ता मिळाली नाही. त्यामुळे कोणत्याही दोन गटाच्या युतीशिवाय सत्तेचे द्वार उघडणे शक्य नाही. त्यामुळे अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या ३० नोव्हेंबरला होणाऱ्या निवडणुकीकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे. दरम्यान, दप्तरी गटाची व जयस्वाल गटाचे प्रमुख जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजय जयस्वाल यांच्यात सामंजस्यपूर्ण चर्चा झाली. दप्तरी गटाला पहिल्या अध्यक्षपदाचा मान देत उपाध्यक्ष पद जयस्वाल गटाने आपल्या वाट्याला घेतले. त्यानुसार शुक्रवारी जयस्वाल गटाकडून असलेले अध्यक्षपदाचे डॉ. राजेश जयस्वाल यांचे नामांकन परत घेणे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही. नामांकन परत घेण्याची वेळ निघून गेल्यानंतर ही गट्टी झाल्याचे सांगितले जात आहे. तत्पूर्वी भाजपाने डॉ. राजेश जयस्वाल यांना थेट अध्यक्षपदाची आॅफर दिली. त्यामुळे जयस्वाल यांनी नामांकन परत घेतले नसल्याची चर्चा आहे. त्याचरात्री या विषयी उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या. यामुळे दप्तरी गटाशी जयस्वाल गटाने केलेली हातमिळविणी विस्कटण्याचे संकेत मिळू लागले आहे. आता विजय जयस्वाल यांनी दप्तरींना दिलेला शब्द पाळल्या जातो की डॉ. राजेश जयस्वाल सख्ख्या भावाचा शब्द मोडून अध्यक्षाची खुर्ची मिळवितात, ही चर्चा सेलूकरांमध्ये चांगलीच रंगत आहे.नवे अध्यक्ष दफ्तरी की जयस्वाल?ऐनवेळेवर सत्तेसाठी काहीही होवू शकते. हे नागरिकांना चांगलेच ठाऊक आहे. भाजपाचे न.पं.तील नवनियुक्त प्रमुख सदस्य चुडामन हांडे हे जयस्वाल गटाचे कट्टर विरोधक मानले जाते. तसेच हांडे हे दप्तरी गटाचेही खाजगी व राजकीय विरोधक आहे. दप्तरीगटाला भाजपाच्या वरिष्ठांनी दबावात घेवून स्वगृही परतून न.पं.वर सत्ता काबीज करण्याबाबत गळ घातली. मात्र चुडामन हांडे यांना कोणतेच पद न.पं. त दिल्या जात नसेल, तर भाजपाशी हात मिळविणी करतो, असे दप्तरी यांनी भाजपाच्या नेत्यांना सांगितले. मात्र भाजपाच्या तीन सदस्यांपैकी दोन सदस्य भाजपाच्या नव्हे, तर हांडे यांनी स्वत:च्या भरवशावर निवडून आणले हे साऱ्यांना ठाऊक आहे. मग हांडे यांना डावलणे भाजपा नेत्यांना शक्य नव्हते. हे समीकरण विस्कटल्यावर जयस्वाल गटाशी दप्तरी गटाने हातमिळवणी केली व दप्तरी गटाचा अध्यक्ष व जयस्वाल गटाचा उपाध्यक्ष, असे सूत्र निश्चित झाले. मात्र भाजपाला दप्तरी यांचा राजकीय काटा काढायचा असल्याने जयस्वाल यांच्याशी असलेले कडवे वैरत्व विसरत थेट राजेश जयस्वाल यांना अध्यक्षपदाची आॅफर दिल्याची आतील गोटातील माहिती आहे.आता जयस्वाल गट दप्तरी यांना दिलेला शब्द पाळतो की काँग्रेस-भाजपा अशी अभद्र युती करीत सत्तेत सहभागी होतो. हे सोमवारी निवडणूक निकालातूनच कळणार आहे.