शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

भाजपातील अंतर्गत कलह चव्हाट्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 21:32 IST

येथील भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमधील राजकीय वाद विकोपाला जाऊन तलवारीने मारहाण करण्यात आली. यात एक युवक गंभीर जखमी झाला. ही घटना स्थानिक विठ्ठल वॉर्डात शनिवारी रात्री ११.४५ वाजताच्या सुमारास घडली. ललित विजय मेश्राम (२८) रा. विठ्ठल वॉर्ड, असे जखमीचे नाव आहे.

ठळक मुद्देविठ्ठल वॉर्डात युवकावर तलवारीने प्राणघातक हल्ला

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : येथील भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमधील राजकीय वाद विकोपाला जाऊन तलवारीने मारहाण करण्यात आली. यात एक युवक गंभीर जखमी झाला. ही घटना स्थानिक विठ्ठल वॉर्डात शनिवारी रात्री ११.४५ वाजताच्या सुमारास घडली. ललित विजय मेश्राम (२८) रा. विठ्ठल वॉर्ड, असे जखमीचे नाव आहे.प्राप्त माहितीनुसार, नितेश मेश्राम आणि भाजपाचे न. प. आरोग्य सभापती रामू राठी हे एकाच राजकीय पक्षात आहेत. त्यांच्यात राजकीय गटबाजीच्या कारणावरून अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. अशातच नितेश मेश्राम व भाजपाचे पदाधिकारी रामू राठी या दोघांची शनिवारी रात्री ११ वाजता येथील न्यायालयासमोर शाब्दीक चकमक झाली. तेथून सदर दोघेही गेल्यावर बाल्या वानखडे, अमित शिंगणे, पुनीत छांगानी, रामू राठी, सुमित शिंगणे, सुनील सारसर, नाना गिरोले, कार्तिक कारमोरे, मंगेश लाडके यांनी नितेश मेश्राम यांच्या घरावर हल्ला केला. त्यावेळी नितेशचा भाऊ ललित मेश्राम हा सुरूवातीला घराबाहेर आला.त्याने रामू राठी व सर्वांना समजविण्याचा प्रयत्न केला. मात्र, बाल्या वानखेडे, पुनीत छांगाणी, अमित शिंगाने व इतरांनी नीतेश मेश्राम याला तलवारीने मारण्याचा प्रयत्न केल्याने त्याने तेथून पळ काढला. अशातच मध्यस्थी करीत असलेल्या ललित याला आरोपींनी तलवारीने मारहाण करून गंभीर जखमी केले. या घटनेची नोंद आर्वी पोलिसांनी घेतली असून पुढील तपास आर्वीचे ठाणेदार संपत चव्हाण यांच्या मार्गदर्शनात गोपाळ ढोले करीत आहेत.दोघे ताब्यात तर सात आरोपी फरारसदर प्रकरणी नितेश विजय मेश्राम याच्या तक्रारीवरून आर्वी पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्ह्याची नोंद घेतली आहे. शिवाय पोलिसांनी कार्तिक कारमोरे व सुमित शिंगणे या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तर या प्रकरणातील सात आरोपी अद्यापही फरार असून त्यांचा शोध पोलिसांकडून घेतल्या जात आहे.