शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

भाजप सरकार मागासवर्गीयांच्या विरूद्धच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 22:18 IST

केंद्र आणि राज्यातील भाजपाचे सरकार पूर्णपणे बहुजन समाज म्हणजेच दलित, आदिवासी, इतर मागासवर्गीय, मुस्लीम यांच्या विरोधातील आहे, ....

ठळक मुद्देविलास गरूड : बसपाचा जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : केंद्र आणि राज्यातील भाजपाचे सरकार पूर्णपणे बहुजन समाज म्हणजेच दलित, आदिवासी, इतर मागासवर्गीय, मुस्लीम यांच्या विरोधातील आहे, हे सांगतानाच बसपाचे प्रदेशाध्यक्ष विलास गरूड यांनी केंद्र व राज्यातील भाजपाशासित सरकारवर टीका केली.चेतना अध्यापक विद्यालयात बसपाचा जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. ते पूढे म्हणाले की, भाजपाने बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावतींना राज्यसभेत बोलू दिले नाही. राज्यसभेत बोलण्यापासून भाजप रोखू शकते; पण बहुजन समाजासमोर रोखण्याची त्यांची ताकद नाही. या कारनाम्यांचा पर्दाफाश करण्यासाठी मायावती १० डिसेंबरला नागपूर येथे येत आहेत. भाजपाविरूद्ध संघर्षाच्या तयारीसाठी कराव्या लागणाºया कार्याची माहिती करून घेण्यासाठी जनतेने कस्तुरचंद पार्क नागपूर येथे उपस्थित राहावे, असे आवाहन गरुड यांनी केले. यावेळी कृष्णा बेले, जितेंद्र म्हैसकर, हेमलता शंभरकर, अ‍ॅड. सुनील डोंगरे, मोहन राईकवार आदी उपस्थित होते. मेळाव्याला मोठ्या संख्येने बसपा कार्यकर्ते उपस्थित होते.चेतना जागृतीच्या माध्यमातून भाजपाला धडानोटबंदी व वस्तुसेवा कर यासारखे निर्णय घेऊन केंद्रातील भाजपा सरकारने सामान्यांना वेठीस धरले. या निर्णयांचा सामान्य नागरिकांनाच सर्वाधिक त्रास सहन करावा लागला. बसपाद्वारे १५ डिसेंबर ते १५ जानेवारी या काळात चेतना जागृती दिंंडीच्या माध्यमातून गावोगावी दोन्ही निर्णय कसे चुकीचे आहे, हे नागरिकांना पटवून दिले जाणार आहे. या दिंडीच्या माध्यमातून भाजपाला धडा शिकविला जाणार असल्याची माहिती बसपाचे जिल्हाध्यक्ष मोहन राईकवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते पूढे म्हणाले की, १० डिसेंबरला नागपूर येथे बसपाचे राज्यस्तरीय कार्यकर्ता महासंमेलन आहे. यात जिल्ह्यातील सुमारे २५ हजार पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होत आहे. जिल्ह्यात १२०० बुथ असून प्रत्येकी २० कार्यकर्ते सहभागी होतील. पूर्वतयारी म्हणून चेतना अध्यापक विद्यालयात बैठक घेण्यात आली.