शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

भाजप-काँग्रेसला समान नगराध्यक्ष पद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 23:32 IST

जिल्ह्यातील चार नगर पंचायतींच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांचे प्रत्येकी अडीच वर्षांचे कार्यकाळ संपुष्टात आले. यामुळे निवडणूक प्रक्रिया जाहीर करण्यात आली होती. या निवडणुकीत प्रमुख पक्ष असलेल्या भाजपा व काँग्रेसला समान नगराध्यक्ष पद प्राप्त झाले आहे.

ठळक मुद्देनगर पंचायत निवडणूक : गजानन राऊत, अनिता भातकुलकर, शारदा माहुरे, कल्पना मस्की यांची वर्णी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील चार नगर पंचायतींच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांचे प्रत्येकी अडीच वर्षांचे कार्यकाळ संपुष्टात आले. यामुळे निवडणूक प्रक्रिया जाहीर करण्यात आली होती. या निवडणुकीत प्रमुख पक्ष असलेल्या भाजपा व काँग्रेसला समान नगराध्यक्ष पद प्राप्त झाले आहे. कारंजा आणि आष्टी येथील नगर पंचायतीचे अध्यक्ष पद काँगे्रसला प्राप्त झाले असून समुद्रपूर व सेलू नगर पंचायतीवर भाजपाचे अध्यक्ष विराजमान झाले आहे. केवळ कारंजा (घा.) येथील नगराध्यक्ष पद काँगे्रसला अविरोध प्राप्त करता आले असले तरी उपाध्यक्ष पदासाठी बंडाळीचे चित्र पाहायला मिळाले. अन्य तीन ठिकाणी निवडणुका घेण्यात आल्या. यात सेलू येथे दोन गटांनी नगराध्यक्ष पद राखण्याकरिता अभद्र युती केल्याने दावा असलेल्या उमेदवाराला पद सोडावे लागले. यात विश्वासघात झाल्याची भावना अनेकांनी बोलून दाखविली. आष्टी (श.) येथे अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी सरळ लढत झाली. समुद्रपूर येथे भाजप व राष्ट्रवादी काँगे्रसच्या उमेदवारात सरळ लढत झाली. चारपैकी दोन ठिकाणी काँगे्रसला आपले अध्यक्ष व उपाध्यक्ष राखता आले तर सेलू येथे युतीमुळे काँगे्रसला उपाध्यक्ष पद मिळाल्याचे पाहावयास मिळाले.आष्टीत अध्यक्षपदी अनिता भातकुलकर तर उपाध्यक्षपदी फरीदा सादिक शाहआष्टी (श.) - आष्टी नगर पंचायतच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक बुधवारी नगर पंचायत सभागृहात आयोजित विशेष सभेत पार पडली. अध्यक्ष पदासाठी काँग्रेसतर्फे अनिता भातकुलकर व भाजपकडून अजय लेकुरवाळे यांनी अर्ज दाखल केले होते. भाजपचे अ‍ॅड. मनीष ठोंबरे यांनी अध्यक्षपदाची उमेदवारी मागे घेतली होती. यामुळे अध्यक्ष पदासाठी काँग्रेसच्या अनिता भातकुलकर व भाजपचे अजय लेकुरवाळे यांच्यात सरळ लढत होती. उपाध्यक्ष पदासाठी काँग्रेसच्या फरीदा सादिक शाह व भाजपचे सुरेश काळबांडे यांनी नामनिर्देशपत्र भरले होते. येथे काँग्रेसचे १०, भाजपचे ६ व अपक्ष एक असे एकूण १७ संख्याबळ आहे. आज दुपारी १ वाजता आयोजित विशेष सभेत झालेल्या निवडणुकीत अध्यक्ष पदासाठी काँग्रेसच्या भातकुलकर यांना ११ तर भाजपचे लेकुरवाळे यांना ६ मते मिळाली. यात ५ मतांनी काँग्रेसच्या अनिता भातकुलकर विजयी झाल्या. उपाध्यक्ष पदासाठी काँग्रेसच्या फरीदा सादिक शाह यांना ११ तर भाजपचे सुरेश काळबांडे यांना ६ मते मिळाली. यामुळे उपाध्यक्षपदी काँग्रेसच्या फरीदा सादीक शाह यांची वर्णी लागली. पीठासन अधिकारी म्हणून एसडीओ प्रकाश शर्मा यांनी काम पाहिले.

टॅग्स :Electionनिवडणूक