शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

जन्मदिनच ठरला त्याचा ‘मृत्युदिन’

By admin | Updated: October 13, 2014 23:24 IST

जन्मदिवसाचे औचित्य साधून त्याच दिवशी साक्षगंध करण्याचे ठरविले. पण साक्षगंध होण्यापूर्वीच तरुणाने जगाचा निरोप घेतल्याची घटना आर्वी येथे घडली. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

आर्वी : जन्मदिवसाचे औचित्य साधून त्याच दिवशी साक्षगंध करण्याचे ठरविले. पण साक्षगंध होण्यापूर्वीच तरुणाने जगाचा निरोप घेतल्याची घटना आर्वी येथे घडली. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या युवकाचे नाव महोम्मद तनवीर मोहम्मद जाबीर असे आहे.मोहम्मद तनवीर मोहम्मद जाबीर (२७) हा मूळचा आर्वी शहरातील रहिवासी असून गत दीड वर्षांपासून पुलगाव येथे वास्तव्यास आहे. नागपूर येथील एका शिकवणी वर्गात कार्यरत असलेल्या तनवीरचा विवाह आर्वीतीलच त्याच्या नात्यात असलेल्या शब्बीर पटेल भुरू पटेल यांच्या मुलीसोबत निश्चित झाला होता. त्या निमित्ताने १२ आॅक्टोबर रोजी साक्षगंधाचा कार्यक्रम येथील एका मंगल कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आला होता. याच दिवशी मोहम्मद तनवीर याचा जन्मदिवस असल्याचे ओचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सर्व नातलग मंडळी कार्यक्रमानिमित्त येथे उपस्थित झाली होती. सकाळी अचानक तनवीरला ताप आला. प्रकृती गंभीर झाल्यामुळे उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता नेण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्याला सावंगी रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. सावंगीचा प्रवास सुरू असताना वाटेतच तनवीरचा मृत्यू झाला. सावंगी रुग्णालयात त्याला नेल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. या घटनेची वार्ता शहरात आल्यावर एकच खळबळ उडाली.(तालुका प्रतिनिधी)