लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जलयुक्त शिवारमध्ये नाला खोलीकरणाचे काम करताना अनेकदा शेतकऱ्यांचा रहदारीचा रस्ता बंद होतो. त्यामुळे यावर्षी नाला खोलीकरणाचे काम करताना शेतकऱ्यांची मागणी असेल त्या ठिकाणी कंपोझिट बंधारे बांधावे. ज्यामुळे शेतकऱ्यांना वाहतुकीसाठी पुलाचा वापर करता येईल. शिवाय नाल्यामध्ये पाणी अडवता येऊन त्याचा सिंचनासाठी उपयोग होईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जलयुक्त शिवार योजनेची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी जिल्हाधिकारी शैलेश नवाल मार्गदर्शन करताना बोलत होते. जिल्हाधिकारी नवाल पुढे म्हणाले, सन २०१५-१६, २०१६-१७ मध्ये नाला खोलीकरणाचे काम सुटले असेल त्या सर्वांची यादी करावी. यामध्ये वनतलाव, गावतलाव आणि कॅनलचा समावेश करावा. ही सर्व कामे विशेष मोहीम राबवून पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात येईल. नाला खोलीकरणात डोह असेल त्या ठिकाणी पिचिंग करणे आवश्यक आहे. धरणाचे कॅनल पुनर्जीवणाचे कच्चे काम जलयुक्त मधून करण्याचे नियोजन यावर्षी लघुसिंचन विभागाने करावे. तसेच कालव्याचे पक्के काम करण्यासाठी पाणी वापर संस्थांची बैठक घेऊन लोकसहभाग मिळवावा. शासन, लोकसहभाग आणि सामाजिक दायित्व निधीतून यावर्षी कॅनलच्या पुनर्जीवणाचे काम करण्यासाठी लघुसिंचन राज्य व जिल्हा परिषद यांनी प्रस्ताव तयार करावा. सिमेंट नाला बांधकाम हे काम तांत्रिक काम असल्यामुळे ते कृषी विभागाच्या ऐवजी लघुसिंचन विभागाने हाती घ्यावे. शिवाय झालेल्या कामांचे छायाचित्र तात्काळ अपलोड करण्यात यावे, अशाही सुचना याप्रसंगी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिल्यात.
नाल्यावर कंपोझिट बंधारे बांधावेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 00:36 IST
जलयुक्त शिवारमध्ये नाला खोलीकरणाचे काम करताना अनेकदा शेतकऱ्यांचा रहदारीचा रस्ता बंद होतो. त्यामुळे यावर्षी नाला खोलीकरणाचे काम करताना शेतकऱ्यांची मागणी असेल त्या ठिकाणी कंपोझिट बंधारे बांधावे. ज्यामुळे शेतकऱ्यांना वाहतुकीसाठी पुलाचा वापर करता येईल.
नाल्यावर कंपोझिट बंधारे बांधावेत
ठळक मुद्देशैलेश नवाल : जलयुक्त शिवार आढावा बैठक